‘विधानसभेत आत्महत्या करेन’; सत्तांतरांचं षडयंत्र उघड करण्याचा नितीन देशमुखांचा शिंदेंना इशारा
एकनाथ शिंदे काही शिवसेना आमदारांना घेऊन सूरतला गेले. त्यांच्यासोबत आमदार नितीन देशमुखही होते. सूरतला गेलेले नितीन देशमुख परत आले. त्यांच्या परतीचे किस्से बरेच चर्चिले गेले. त्याच आमदार नितीन देशमुखांनी आता सत्तांतराबद्दल महत्त्वाचा गौप्यस्फोट केलाय. पैशांच्या बळावर सत्तांतर झालं असून, सिद्ध केलं नाही तर विधानसभेत आत्महत्या करेन, असा इशाराच देशमुखांनी शिंदेंना दिलाय. अकोल्यात शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा […]
ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे काही शिवसेना आमदारांना घेऊन सूरतला गेले. त्यांच्यासोबत आमदार नितीन देशमुखही होते. सूरतला गेलेले नितीन देशमुख परत आले. त्यांच्या परतीचे किस्से बरेच चर्चिले गेले. त्याच आमदार नितीन देशमुखांनी आता सत्तांतराबद्दल महत्त्वाचा गौप्यस्फोट केलाय. पैशांच्या बळावर सत्तांतर झालं असून, सिद्ध केलं नाही तर विधानसभेत आत्महत्या करेन, असा इशाराच देशमुखांनी शिंदेंना दिलाय.
अकोल्यात शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात आमदार नितीन देशमुखांनी त्यांच्याविरुद्ध सुरू झालेल्या लाच प्रकरणाचा उल्लेख करत सत्तांतराबद्दल आपल्याकडे व्हिडीओ असल्याचा इशारा दिला आहे.
दसरा मेळाव्याची एकनाथ शिंदेंची जागा फिक्स; उद्धव ठाकरेंची स्ट्रॅटेजी चुकली?
राज्यातील सत्तांतरांबद्दल नितीन देशमुख काय म्हणाले?
अकोल्यातल्या सभेत नितीन देशमुख म्हणाले, ‘पाच दिवसांपूर्वी माझ्यावर अँटी करप्शनची चौकशी लावलीये. अँटी करप्शनच्या एसपींनी सांगितलं की, तुमचं काही असेल, वर जाऊन भेटा. मला ईडीची चौकशी लावायला हवी. अँटी करप्शनची कशाला लावता. ईडीची चौकशी लावली तर समाजात माझी इज्जत वाढली असती. माझ्या मुलाला चांगलं स्थळ येईल. माझी तुरूंगात जायची तयारी आहे’, असं नितीन देशमुख म्हणाले.