Raj Thackeray: 'एकदा काय ते होऊन जाऊ द्या!', अजान सुरु होताच राज ठाकरे भडकले!

राज ठाकरे यांच्या सभेदरम्यान अजान सुरु होताच ते प्रचंड संतापले. यानंतर अतिशय आक्रमकरित्या राज ठाकरे यांनी या मुद्द्यावर भाषण केलं. पाहा काय म्हणाले राज ठाकरे.
Raj Thackeray: 'एकदा काय ते होऊन जाऊ द्या!', अजान सुरु होताच राज ठाकरे भडकले!
mns chief raj thackeray erupted as soon as azan started during speech aurangabad sabha

औरंगाबाद: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (1 मे) औरंगाबादमधील भाषणादरम्यान मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी अत्यंत आक्रमक शब्दात भूमिका मांडली. दरम्यान, त्यांच्या भाषणात एक अशी घटना घडली की, ज्यामुळे राज ठाकरे हे मशिदीवरील भोंग्यांवर अधिकच संतापले.

नेमकं काय झालं?

औरंगाबादमधील सांस्कृतिक मैदानावर राज ठाकरे यांचं भाषण सुरु होतं. त्यावेळी ते मशिदीवरील भोंग्यांवर बोलत होते. पण त्याचवेळी अजान सुरु झाली आणि त्याचा आवाज राज ठाकरेंच्या कानी पडला. अजानचा आवाज पडताच राज ठाकरे हे प्रचंड संतापले.

'इथे जे कोणी पोलीस अधिकारी असतील त्यांना मी सांगतोय की, त्यांनी आत्ताच्या आत्ता जाऊन हे बंद करा. आणि माझं म्हणणं आहे याबाबतीत की, त्यांना जर सरळ भाषेत समजत नसेल ना. तर एकदा काय ते होऊनच जाऊ द्या...'

'हे जर या पद्धतीने वागणार असतील यांना जर सरळ सांगून समजत नसेल तर महाराष्ट्राच्या मनगटात काय ताकद आहे ना ती यांना एकदा दाखवावीच लागेल.'

'जर हे सभेच्या वेळेला बांग सुरु करणार असतील आपण आत्ताचा आत्ता तोंडात बोळा कोंबावा. यांना जर सरळसरळ मार्गाने समजत नसेल तर मग त्यानंतर महाराष्ट्रात काय होईल मला माहिती नाही.' असं म्हणत राज ठाकरेंनी भोंगे उतरवले गेलेच पाहिजे असा आक्रमक पवित्रा घेतला.

राज ठाकरेंनी पोलिसांना तात्काळ भोंगे बंद करण्यास सांगितलं
राज ठाकरेंनी पोलिसांना तात्काळ भोंगे बंद करण्यास सांगितलं

पाहा राज ठाकरे यावेळी नेमकं काय-काय म्हणाले:

'उत्तरप्रदेशमध्ये जर लाऊडस्पीकर उतरवले जाऊ शकतात तर माझ्या महाराष्ट्रात का नाही उतरवले जाऊ शकत? सगळेच्या सगळे लाऊडस्पीकर अनधिकृत आहेत. सुप्रीम कोर्टाने सांगितलं पण आहे की, तुम्ही स्थानिक पोलिसांच्या परवानगीशिवाय तुम्ही लाऊड स्पीकर लावू शकत नाही. किती मशिदींकडे परवानग्या आहेत? कोणाकडेच परवानगी नाही.'

'मला इथे कोणी तरी सांगितलं की, इथे संभाजीनगरमध्ये सहाशे मशिदी आहेत. बांगेची कॉन्सर्ट चालते की काय इकडे? फक्त संभाजीनगरमध्ये नाही संपूर्ण देशभर आहे हे. हे संपूर्ण देशातील लाऊडस्पीकर खाली आले पाहिजे. सगळ्यांना समान धर्म असला पाहिजे.'

'रस्त्यावर येऊन तुम्ही नमाज पढता. कोणी अधिकार दिले तुम्हाला? माझी शासनाला विनंती आहे. आज तारीख एक आहे. उद्या तारीख दोन आहे. तीन तारखेला ईद आहे. त्यांच्या सणात मला काही विष कालवायचं नाही. पण चार तारखेपासून ऐकणार नाही. माझी महाराष्ट्रातील तमाम हिंदूंना विनंती आहे की, जिथे-जिथे यांचे लाऊडस्पीकर लागतील त्यांच्यासमोर दुप्पट आवाजाने तुमची हनुमान चालीसा ही लागलीच पाहिजे.'

'विनंती करुन समजत नसेल तर आमच्यासमोर दुसरा पर्याय उरत नाही. लाऊडस्पीकर तुमच्या धर्मात बसत नाही. जे सुप्रीम कोर्टाच नियम काय सांगतायेत ना.. त्या सुप्रीम कोर्टाच्या नियमात..'

(अजान सुरु झाल्याचा आवाज) 'माझी पोलिसांना नम्र विनंती आहे. जर हे सभेच्या वेळेला बांग सुरु करणार असतील आपण आत्ताचा आत्ता तोंडात बोळा कोंबावा. यांना जर सरळसरळ मार्गाने समजत नसेल तर मग त्यानंतर महाराष्ट्रात काय होईल मला माहिती नाही.'

'इथे जे कोणी पोलीस अधिकारी असतील त्यांना मी सांगतोय की, त्यांनी आत्ताच्या आत्ता जाऊन हे बंद करा. आणि माझं म्हणणं आहे याबाबतीत की, त्यांना जर सरळ भाषेत समजत नसेल ना. तर एकदा काय ते होऊनच जाऊ द्या...'

'अजिबात शांत बसता कामा नये तुम्ही.. संभाजीनगरच्या पोलिसांना मी परत सांगतोय.. हे जर या पद्धतीने वागणार असतील यांना जर सरळ सांगून समजत नसेल तर महाराष्ट्राच्या मनगटात काय ताकद आहे ना ती यांना एकदा दाखवावीच लागेल. म्हणून माझी पोलिसांना विनंती आहे की, यांची एकदा थोबाडं बंद करा. माझी संपूर्ण देशवासियांना विनंती आहे की, बिल्कुल मागचा पुढचा विचार करु नका. हे भोंगे उतरलेच पाहिजे.'

'सगळ्या धार्मिक स्थळांवरचे भोगे... उद्या मंदिरांवरचे असले तरीही उतरले गेले पाहिजे. पण यांचे उतरले गेल्यानंतर..'

mns chief raj thackeray erupted as soon as azan started during speech aurangabad sabha
भर सभेत 'मुंबई Tak'ची मुलाखत दाखवत राज ठाकरेंची पवारांवर तुफान टीका

'आज ही परिस्थिती आहे की, अभी नही तो कभी नही.. माझी हिंदू बांधवांना विनंती आहे की, जर हे 3 तारखेपर्यंत ऐकले नाहीत तर हनुमान चालीस ऐकू आली पाहिजेच. पोलिसांकडून रितसर परवानगी घ्या. ती घ्यावीच लागेल. हा विषय कायमचा निकाली लागेल ही अपेक्षा करतो.' अशी आक्रमक भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे.

Related Stories

No stories found.