Mood of the Nation: मोदी की गांधी, आज निवडणुका झाल्या तर कोणाची येईल सत्ता?

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Mood of the Nation India Today-C Voter Survey: मुंबई: जर देशात या घडीला निवडणुका (Election) झाल्या तर देशात परिस्थिती काय असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना देशात किती पसंती आहे. कोणत्या मुद्द्यांवर मोदींचं सरकार यशस्वी ठरलंय आणि कोणत्या मुद्द्यांवर सरकार अपयशी ठरलंय. या सगळ्या गोष्टींबाबत India Today-C Voter ने केलेल्या सर्व्हेबाबत सविस्तरपणे जाणून घेऊया. (mood of the nation india today c voter modi or gandhi if lok sabha elections are held in country today who will come to power)

पाहा India Today-C Voter सर्व्हेनुसार देशातील जनता कोणच्या हातात सोपवेल सत्ता

1. आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर NDA आणि UPA ला किती जागा मिळतील

इंडिया डुटे-C वोटर सर्व्हेनुसार जर आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर NDA ला तब्बल 298 जागा मिळतील. तर UPA ला 153 जागा मिळतील.

याचा अर्थ असा की, या परिस्थितीत सुद्धा NDA चं सरकार येईल. ही गोष्ट स्पष्टपणे दिसते आहे. अर्थात यामध्ये NDA च्या जागा मात्र कमी झालेले पाहायला मिळत आहेत 2019 च्या तुलनेने. मात्र तरीही NDA चं सरकार पुन्हा येऊ शकतं. हे या सर्व्हेतून सध्या तरी दिसतं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

2. आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर NDA आणि UPA ला किती व्होट शेअर मिळतील

इंडिया डुटे-C वोटरने केलेल्या सर्व्हेनुसार जर आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर NDA चा व्होट शेअर हा तब्बल 42.8 टक्के एवढा असेल. तर UPA चा व्होट शेअर हा 29.6 टक्के एवढा राहील.

ADVERTISEMENT

व्होट शेअरमध्ये फारसा काही बदल झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे NDA च्या बाजूने पुन्हा एकदा कौल पाहायला मिळत आहे.

ADVERTISEMENT

Mood Of The Nation : आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास काय असेल चित्र?

3. आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील?

2019 मध्ये भाजपच्या 300 पेक्षा जास्त जागा होत्या. त्यामुळे सरकार बनवताना सगळं नियंत्रण हे मोदींकडे होतं.

मात्र आता इंडिया डुटे-C वोटरने केलेल्या सर्व्हेनुसार आज जर लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर भाजपला बहुमतापेक्षा किमान 10 ते 11 जागा अधिक मिळू शकतात. म्हणजेच भाजपला 284 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला 68 आणि इतरांना मिळून 191 जागा मिळण्याचा अंदाज सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आला आहे.

4. आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाचा किती व्होट शेअर असेल?

इंडिया डुटे-C वोटरने केलेल्या सर्व्हेनुसार जर आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर भाजपचा व्होट शेअर हा 38.5 टक्के एवढा असू शकतो. तर काँग्रेसचा व्होट शेअर 22.2 टक्के आणि इतरांचा व्होट शेअर हा 39.3 टक्के एवढा राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

5. देशातील जनता पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींच्या कामगिरीवर किती खूश?

इंडिया डुटे-C वोटरने केलेल्या सर्व्हेनुसार देशातील 45.8 टक्के जनतेच्या मते पंतप्रधान म्हणून मोदींची कामगिरी ही उत्कृष्ट आहे. तर 25.7 टक्के लोकांच्या मते त्यांची कामगिरी उत्तम आहे. तर 10.1 टक्के लोकांचं म्हणणं आहे की, मोदींची कामगिरी ही साधारण आहे.

तर 7.4 टक्के जनतेच्या मते पंतप्रधान मोदींची कामगिरी ही खराब आहे. तर 8.8 टक्के जनतेला त्यांची कामगिरी ही अतिखराब वाटते. या रेटिंगमध्ये लोकांनी वजन पंतप्रधान मोदींच्या पारड्यात टाकलं आहे.

Mood Of The Nation : भारतातले सर्वात लोकप्रिय पंतप्रधान कोण? वाचा इंडिया टुडेचा सर्व्हे

6. NDA सरकारची मोठी कामगिरी कोणती?

इंडिया डुटे-C वोटरने केलेल्या सर्व्हेनुसार NDA सरकारची सर्वात मोठी कामगिरी ही कोव्हिडमध्ये हाताळलेली स्थिती आहे. 20.4 जनतेच्या मते NDA सरकारने कोव्हिडमधील परिस्थिती योग्यरित्या हाताळली.

तर 13.8 टक्के लोकांच्या मते मोदी सरकारची दुसरी मोठी कामगिरी ही कलम 370 रद्द करण्याची आहे. याशिवाय 11.5 टक्के लोकांचं म्हणणं आहे की, राम मंदिर ही आणखी एक NDA सरकारची मोठी कामगिरी आहे. तर 8.3 लोकांचं म्हणणं आहे की, समाजकल्याण योजना ही देखील NDA सरकारने केलेली मोठी कामगिरी आहे.

7. NDA सरकारचं अपयश काय?

इंडिया डुटे-C वोटरने केलेल्या सर्व्हेनुसार NDA सरकारचं सर्वात मोठं अपयश म्हणजे देशातील वाढती महागाई. 25 टक्के लोकांच्या मते महागाई हे NDA सरकारचं अपयश आहे. या पाठोपाठ 17 टक्के लोकांच्या मते बेरोजगारी हे NDA सरकारचं दुसरं अपयश आहे. तर 8 टक्के लोकांना वाटतं की, सरकारने कोव्हिड स्थिती ज्या प्रकारे हाताळली ते त्यांचं सर्वात मोठं अपयश आहे. तर 5.5 टक्के लोकांच्या मते नोटाबंदी हे NDA सरकारचं अपयश आहे.

8. कोणत्या राज्यांमध्ये NDA च्या जागांची काय असेल स्थिती?

इंडिया डुटे-C वोटरने केलेल्या सर्व्हेनुसार जर आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर NDA ला कर्नाटक, महाराष्ट्र आणि बिहार या राज्यांमध्ये फटका बसण्याची शक्यता आहे. कारण या राज्यांमध्ये त्यांच्या जागा कमी होऊ शकतात. तर दुसरीकडे आसाम, तेलंगणा, प. बंगाल आणि उ. प्रदेशमध्ये मात्र NDA च्या जागा वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

त्यामुळे India Today-C Voter च्या सर्व्हेनुसार, आज जर लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर देशातील जनता ही पुन्हा भाजपच्या हातात सत्ता देऊ शकते. तसेच ते पुन्हा एकदा मोदींच्या पाठिशी उभे राहिलेले दिसून येतात.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT