तुझा ओम बाळ, कलेक्टर अन् तुला वेळ आल्यास संपवून टाकू : उमेदवाराच्या घरावर धमकीचं पत्र
उस्मानाबाद, गणेश जाधव : ग्रामपंचायत निवडणुकांवरून उस्मानाबाद जिल्ह्यात राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच खासदार ओमराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे आणि मसला खुर्द गावातील ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवार कांताबाई साळवे आणि त्यांचा मुलगा, राष्ट्रवादी किसान सेल प्रदेश सचिव ज्ञानेश्वर साळवे यांना एकत्रितपणे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. साळवे यांच्या घरावर अज्ञात व्यक्तीनं हे धमकीचं पत्र चिटकवलं आहे. […]
ADVERTISEMENT

उस्मानाबाद, गणेश जाधव :
ग्रामपंचायत निवडणुकांवरून उस्मानाबाद जिल्ह्यात राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच खासदार ओमराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे आणि मसला खुर्द गावातील ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवार कांताबाई साळवे आणि त्यांचा मुलगा, राष्ट्रवादी किसान सेल प्रदेश सचिव ज्ञानेश्वर साळवे यांना एकत्रितपणे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. साळवे यांच्या घरावर अज्ञात व्यक्तीनं हे धमकीचं पत्र चिटकवलं आहे.
काय आहे पत्रात?
ज्ञानेश्वर साळवे मदत कर, मतदानातून माघार घे, शेवट पाठिंबा दे, नाही तर गावात राहायचं अवघड होईल. तुझा खासदार ओम बाळ, तुझा कलेक्टर आणि तुला बघून घेऊ, वेळी आली तर संपवूनही टाकू. इथून तुझ्या आईला मतदान कोण करतयं ते आम्ही बघत आहोत. मतदान केंद्रात कोण जातय बघताव… वेळ आली तर तुला पण कायमचं संपवून टाकू, तुझा खासदार बाळ अन् कलेक्टरला पण परिणाम भोगावे लागतील. लय दलित समाजावर उड्या मारतोय काय बघू आता.