ऋतुजा ताईंना संभाळा... २०२४ मधील निकालात त्या 'तृप्ती सावंत' होतील : मुरजी पटेल

Andheri bypoll election results : २०१५ च्या पोटनिवडणुकीत विजय मिळविलेल्या तृप्ती सावंत यांचा २०१९ च्या निवडणुकीत पराभव झाला होता....
Rutuja Latake - Muraji Patel
Rutuja Latake - Muraji Patel Mumbai Tak

मुंबई : ऋतुजा लटके यांनी आता विजय मिळविला आहे. अंधेरीला पहिल्यांदा महिला आमदार मिळाला आहे. अंधेरीच्या विकासासाठी आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करणार आहे. मात्र आता ऋतुजा ताईंना संभाळा. २०२४ ला पुन्हा भेटू. त्यावेळी वांद्रेतील तृप्ती सावंतांच्या पराभवाप्रमाणे ऋतुजा लटकेंचाही पराभव होईल, असा इशारा भाजपचे या निवडणुकीत माघार घेतलेले उमेदवार मुरजी पटेल यांनी दिला.

नोटाला मिळालेली मत भाजपची आहे, भाजपने नोटाचा प्रचार केला होता, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा विजयी उमेदवार ऋतुजा लटके यांनी भाजप आणि मुरजी पटेल यांच्यावर केला. या आरोपांवर बोलताना ते म्हणाले, आरोप करणाऱ्यांनी काहीतरी वाटतं असतं आम्हाला शबासकी दिली असती. भाजपने महाराष्ट्राची संस्कृती म्हणून या निवडणुकीतून माघार घेतली होती. अन्यथा आज काही तरी वेगळा निकाल लागला असता.

मुरजी पटेल म्हणाले, शिवसेनेने आपली पूर्ण ताकद अंधेरीमध्ये लावली होती. २० आमदार, तीन खासदार, असे सगळे जण मैदानात उतरले होते. पण २०१९ पेक्षा आता शिवसेनेची मत वाढली असली तरी ही निवडणूक सात पक्षांनी लढविली होती. त्यानंतर देखील तब्बल १ लाख ९० हजार अंधेरीकर मतदानापासून दूर का राहिले? याचं उत्तर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेने दिले पाहिजे. २०१९ मध्ये काँग्रेसचे २७ हजार मतदान आहे, राष्ट्रवादीचे १० हजार, समाजवादीचे ८ हजार मतदान आहे. हे सर्व मतदान गेले कुठे याचं उत्तर दिलं पाहिजे, असाही सवाल त्यांनी केला.

नोटाचा प्रचार :

अंधेरी पूर्वमध्ये नोटाल मिळालेली मत एवढीच भाजपला मिळणार याचा अंदाज आल्याने मुरजी पटेल यांनी अर्ज माघारी घेतला, असा आरोप विजयी उमेदवार ऋतुजा लटके यांनी केला. यावर मुरजी पटेल यांनी भाजपची मत किती आहेत, हे तुम्हाला महापालिका निवडणुकीत दिसेल. आमचे इथे ५ नगरसेवक आहेत. तसंच वाह्यरल व्हिडीओमध्ये दिसत असलेल्यांमध्ये एकही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नाही. भाजपला बदनाम करण्यासाठी हे कारस्थान केलेलं आहे, असाही आरोप त्यांनी केला

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in