काँग्रेसमधल्या संस्थानिकांना नाना पटोलेंचा दम, ‘पक्ष तुमच्या घरचा…’

मुंबई तक

Nana Patole warn congress leaders : विधान परिषद निवडणुकीच्या (Maharashtra legislative council election 2023) निमित्ताने काँग्रेसमध्ये (Congress) चांगलीच सुंदोपसुंदी रंगलीये. सुधीर तांबे आणि सत्यजित तांबेंनी (Sudhir tambe and satyajeet tambe) थेट पक्ष शिस्तीलाच आव्हान दिलं. त्यामुळे काँग्रेसमधील गटातटाचं (Politics in congress) राजकारणही चर्चेत आलं. काँग्रेसमधील प्रदेशानिहाय असलेल्या नेत्यांमधील वादही केंद्रस्थानी आला. या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Nana Patole warn congress leaders : विधान परिषद निवडणुकीच्या (Maharashtra legislative council election 2023) निमित्ताने काँग्रेसमध्ये (Congress) चांगलीच सुंदोपसुंदी रंगलीये. सुधीर तांबे आणि सत्यजित तांबेंनी (Sudhir tambe and satyajeet tambe) थेट पक्ष शिस्तीलाच आव्हान दिलं. त्यामुळे काँग्रेसमधील गटातटाचं (Politics in congress) राजकारणही चर्चेत आलं. काँग्रेसमधील प्रदेशानिहाय असलेल्या नेत्यांमधील वादही केंद्रस्थानी आला. या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Maharashtra congress president) नाना पटोले (nana patole) यांनी मुंबई Tak ला खास मुलाखत दिली. या मुलाखतीत नाना पटोले यांनी संस्थानिक शब्दाच्या आडून बड्या नेत्यांना अप्रत्यक्षपणे इशारा दिला.

नाना पटोले सत्यजित तांबे, सुधीर तांबे आणि काँग्रेसमधील सद्यस्थितीवर काय बोलले? वाचा मुलाखत

प्रश्न: सत्यजीत तांबेना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं. तुमची याबाबतची नेमकी बाजू काय?

नाना पटोले: महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे. महाराष्ट्र हा काँग्रेस विचारांचा आहे. एक काळ होता की, महाराष्ट्रात काँग्रेसच्या नावावर कोणीही उभं केलं तरी निवडून यायचा. अशी ती परिस्थिती होती. अनेक संस्थानिक कुटुंबीय काँग्रेससोबत जोडले गेले. त्यानांही सत्तेत सहभागी होता आलं. मोठ्या-मोठ्या पदावर ते राहिले. काही ठिकाणी अॅडजस्टमेंटचं राजकारण झालं. त्यामुळे काँग्रेसला नुकसान झालं असेल. या सगळा अंदाज आहे. आता तुम्ही जो प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नावर साध्या आणि सरळ भाषेत सांगतो की, ते सगळ्यांनां कळतं की, जो मतदारसंघ आहे पदवीधर मतदारसंघ आहे.

म्हणजे सुशिक्षित लोकांचा मतदार आहे. डॉ. सुधीर तांबे, त्यांच्या पती तसेच सत्यजीत तांबे त्यांच्या पत्नी आणि थोरात साहेबांची मुलगी हे पाच लोकंच फॉर्म भरायला जातात. फॉर्म भरत असताना त्या ठिकाणी अपक्ष फॉर्म भरतात. सुधीर तांबेंना तिकीट देऊन सुद्धा ते फॉर्म भरत नाही. बाहेर आल्यावर सत्यजीत तांबे म्हणतात की, मी फडणवीस आणि बावनकुळेंकडे जाऊन त्यांची मदत घेऊ अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी करणं.

हे वाचलं का?

    follow whatsapp