नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरे उद्या एकाच व्यासपीठावर; कार्यक्रमाकडे सर्व राज्याचे लक्ष!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या एकाच मंचावर येणार आहेत. निमित्त आहे राजभवनातील क्रांतिकारी गॅलरीचे उद्‌घाटन.
नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरे उद्या एकाच व्यासपीठावर; कार्यक्रमाकडे सर्व राज्याचे लक्ष!
Narendra Modi | Uddhva ThackerayMumbai Tak

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या एकाच मंचावर येणार आहेत. निमित्त आहे राजभवनातील 'क्रांती गाथा' गॅलरीचे उद्‌घाटन. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे प्रमुख अतिथी आहेत. विद्यासागर राव राज्यपाल असताना राजभवनात एक भुयार सापडले होते. त्या भुयारामध्ये एक गॅलरी स्थापन करण्यात आली आहे आणि त्याच गॅलरीचे उद्घाटन मोदींचे हस्ते होणार आहे. राज्यातील शिवसेना आणि भाजपचे राजकारण पाहता दोघांचे एकत्र येणे चर्चेचा विषय ठरला आहे.

उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. उद्या दुपारी १.४५ वाजता नरेंद्र मोदी देहूतील संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण करणार आहेत. त्यानंतर ते मुंबईला रवाना होणार आहेत. राजभवनामध्ये मोदींचा दुसरा कार्यक्रम आहे. आणि याच कार्यक्रमात पंतप्रधान आणि मुख्यमंत्री एकत्र दिसणार आहेत.

लता मंगेशकर पुरस्काराला जाणे टाळले होते, कारण...

कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर उद्धव ठाकरेंच्या नावाचा उल्लेख नसल्याने या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत, अशी अटकळ बांधली गेली. या कार्यक्रमासाठी मंगेशकर कुटुंबीयांनी उद्धव ठाकरे यांना निमंत्रित केले होते, मात्र निमंत्रण पत्रिकेवर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख नव्हता. सीएमओला हे प्रोटोकॉलच्या विरोधात वाटले. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावाचा उल्लेख निमंत्रण पत्रिकेवर ठळकपणे व्हायला हवा होता परंतु तो करण्यात आला नव्हता.

मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलीच भेट झाली होती 'बंद दाराआड'

भाजपसोबतस युती तुडल्यानंतर आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले होते. त्यावेळी मोदी आणि उद्धव ठाकरेंच्या बराच वेळ चर्चा झाली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत अजित पवार, अशोक चव्हाण देखील होते. परंतु चर्चा मात्र दोघांमध्येच झाली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा झाली होती.

मोदी 'या' कार्यक्रमालाही राहणार उपस्थीत

मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलात मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवातही पंतप्रधान सहभागी होणार आहेत. मुंबई समाचार साप्ताहिक म्हणून छापण्याची सुरुवात 1 जुलै 1822 रोजी फरदुंजी मर्झबंजी यांनी केली. पुढे 1832 मध्ये ते दैनिक बनले. 200 वर्षांपासून हे वृत्तपत्र सतत प्रकाशित होत आहे. या अनोख्या पराक्रमाच्या स्मरणार्थ टपाल तिकीटही प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in