Sharad Pawar: 'ही वाद घालायची वेळ नाही..', केजरीवालांच्या भेटीनंतर पवारांची गुगली! - Mumbai Tak
Mumbai Tak /बातम्या / Sharad Pawar: ‘ही वाद घालायची वेळ नाही..’, केजरीवालांच्या भेटीनंतर पवारांची गुगली!
बातम्या राजकीय आखाडा

Sharad Pawar: ‘ही वाद घालायची वेळ नाही..’, केजरीवालांच्या भेटीनंतर पवारांची गुगली!

ncp chief sharad pawar has announced that he will support to arvind kejriwal

Sharad Pawar and AAP: मुंबई: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज (25 मे) मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे काही महत्त्वाचे नेते देखील उपस्थित होते. यावेळी या नेत्यांमध्ये सध्याच्या राजकीय स्थितीवर बरीच चर्चा झाली. ज्यानंतर अरविंद केजरीवाल आणि शरद पवार यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये शरद पवारांनी आपण लोकशाही वाचविण्यासाठी अरविंद केजरीवाल यांच्या पाठिशी कायम आहोत. असं सांगत त्यांना समर्थन दिलं आहे. (ncp chief sharad pawar has announced that he will support to arvind kejriwal)

पाहा पत्रकार परिषदेत शरद पवार काय-काय म्हणाले:

‘सध्या संसदीय लोकशाहीच्या व्यवस्थेवर आघात सुरू आहे’

‘देशासमोर एक नवीन अडचण निर्माण झाली आहे. हा विषय फक्त दिल्लीचा आहे असं आम्ही मानत नाही. आम्ही मानतो की, लोकशाही वाचवायची आहे की नाही.. कारण दिल्लीत जो आघात होतोय. तो संसदीय लोकशाहीच्या व्यवस्थेवर आघात होतोय. लोकशाहीत निवडून आलेलं सरकार हे सत्तेत असतं. ते निर्णय घेतील की नेमणूक केलेले राज्यपाल? निवडून आलेल्या सरकारला दुर्लक्षित केलं जाण्याची समस्या ही आज सर्वांसमोर आहे.’

‘ही वेळ वाद घालण्याची नाही, लोकशाही वाचविण्याची आहे’

‘आम्हाला हे वाटतं की, ही वेळ आपण कोणत्या पक्षाचे किंवा तुमची नीती काय आहे यावर वाद घालण्याची ही वेळ नाही. ही वेळ आहे लोकशाही वाचविण्याची. संसदीय लोकशाही वाचविण्याची. तसंच सामान्य लोकांचं मत घेऊन आपल सरकार बनिवण्याचा जो अधिकार आहे तो सामान्य जनतेचा मतदानाचा अधिकार वाचविण्यासाठी आज अरविंदजी हे इथे आले आहेत. याबाबत समर्थन मागण्यासाठी.’

केजरीवालांना पवारांचं समर्थन, ‘अशी’ करणार मदत

‘माझं म्हणणं एवढंच आहे की, मला पूर्ण विश्वास आहे की, महाराष्ट्रातील जनता देखील अरविंदजींनी जो प्रस्ताव दिला आहे याचं समर्थन करेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपल्याकडून पूर्ण ताकदीने मदत करेल. पण मी आता विचार करत होतो की, मला सभागृहात येऊन 56 वर्ष झाली. या 56 वर्षाचा एक फायदा होतो की, देशातील कोणत्याही राज्यात गेलो तर तिथे कोणी नेता असेल, किंवा खासदार असो त्यांच्याशी माझे काही ना काही वैयक्तिक नाती ही मागील अनेक वर्षांपासून निर्माण झाले आहेत. अनेक लोकांसोबत मी काम केलं आहे. त्यामुळे प्रश्न दिल्ली किंवा तुमचा नाही..’

‘हा प्रश्न की, देशात निवडून आलेल्या सरकारला सत्ता राबविण्याचा जो अधिकार जनतेने दिला आहे त्यावर हल्ले होत आहेत. त्यापासून वाचलं पाहिजे. याबाबतीत माझ्या पक्षाकडून तुम्हाला पाठिंबा तर मिळेलच पण अन्य राज्यातही आम्ही काही जणांना सांगू शकतो की, तुमच्यासोबत यायला. सल्ला देऊ शकतो की, ही जबाबदारी आम्ही काही प्रमाणात घेऊ आणि आम्ही तुमच्यासोबत येऊ.’, असं जाहीरपणे शरद पवार यांनी सांगितलं.

संसदेच्या नव्या इमारतीबाबत काय म्हणाले शरद पवार?

‘या देशात संसदेची इमारत आहे. आम्ही त्याच इमारतीत जातो. जगभरातील लोकं जेव्हा दिल्लीत येतात तेव्हा जसं राष्ट्रपती भवन पाहतात तसंच संसदेची इमारत देखील पाहतात. तिथे कोणी विरोध केला नाही.. ठीक आहे तुम्ही नवी इमारत बनवली.. खरं तर त्याबाबत आधी आम्हा कोणाला काही माहितच नव्हती. याची आवश्यकता काय होती यावर चर्चा होऊ शकली असती. हा मुद्दा इथे चर्चा करू इच्छित नाही.. सभागृहात जेव्हा हा मुद्दा येईल तेव्हा आम्ही तिथे बोलू.’ असंही शरद पवार म्हणाले.

अरविंद केजरीवाल नेमकं काय म्हणाले?

दरम्यान, याच पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहे.

‘जर भाजप सत्तेवर आली नाही, तर विरोधी पक्षासोबत तीन घटना घडतात,असे केजरीवाल यांनी सांगितले. पहिली घटना म्हणजे, आमदारांना विकत घेऊन भाजप सरकार स्थापते. किंवा ईडी,सीबीआयची धमकी देऊन आमदारांना तोडण्याचा प्रयत्न करुन करून स्वत:ची सरकार स्थापन करते. तसेच जर आमदार विकले गेले नाहीत आणि धमकीलाही घाबरले नाहीत, तर अध्यादेश काढून गर्व्हनरच्या सहाय्याने त्यांना काम करून दिले जात नाही’, असा भाजपचा संपूर्ण कार्यक्रम असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

दरम्यान केंद्र सरकारने दिल्ली सरकारला अधिकार बहाल करणारा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलून अध्यादेश काढून राज्यपालांना प्रशासनाचे अधिकार बहाल केले आहेत. या संदर्भातील बील हे भाजपा संसदेत मांडणार आहे. त्यामुळे हे बील संसदेत पास होऊ नये यासाठी अरविंद केजरीवाल भाजप विरोधी पक्षाची भेट घेत आहे. आज केजरीवाल यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्या बील विरोधात मत देण्याचे आश्वासन दिल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. बुधवारी यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.

भाजप विरोधी सर्वत्र एकवटले तर बे बील मंजूर होणार नाही.त्यामुळेच केजरीवाल देशातील विरोधी पक्षाची भेट घेऊन त्यांना हे बिल संसदेत पास होऊ नये यासाठी आग्रही करून घेत असल्याचे बोलले जात आहे.

ऑस्ट्रेलियाच्या स्टार क्रिकेटरची बायको अभिनेत्रींपेक्षाही ग्लॅमरस WTC फायनलपूर्वी स्टार क्रिकेटरची निवृत्तीची घोषणा ‘या’ तरुणीला पाहून तुम्ही व्हाल थक्क, म्हणाल ही तर… चाळीशी ओलांडून देखील अभिनेत्री ‘सिंगल’,कोण आहेत ‘या’ Actress? ‘या’ अभिनेत्रीने खरेदी केलं तब्बल 190 कोटींचं घर? Train Accident: सर्वात भयंकर ट्रेन अपघात, फोटो पाहून आपणही हादरून जाल! Isha Ambani चा रॉयल बंगला! प्रत्येक कोपरा हिऱ्यासारखा चकाकणारा.. MS Dhoni ने चाहत्यांची ‘ही’ इच्छा केली पूर्ण! Viral Video पाहिलात का? निसा देवगनसोबत ‘हा’ तरूण आहे तरी कोण?, Photo Viral Sanya Malhotra : 31 वर्षीय अभिनेत्रीला इम्पोस्टर सिंड्रोमने ग्रासले, सांगितला अनुभव! Anemia : शरीरात असेल रक्ताची कमतरता.. तर खा फक्त ‘हे’ फळ! ‘हे’ बॉलिवूड सेलिब्रिटी जे मुलं असूनही अनाथांचे झाले ‘मायबाप’ Malaika Arora च्या प्रेग्नेंसीवरून अर्जुन भडकला! कारण.. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणारे ‘गागाभट्ट’ कोण? IND-AUS : WTC फायनलमध्ये ड्रॉ झाली तर, विजेता कोण ठरणार? शिवराज्याभिषेक म्हणजे काय? shiv Rajyabhishek 2023 : 350 वर्षापूर्वी किल्ले रायगडावर घडला होता इतिहास Sonakshi Sinha : …अन् सलमान खानने तिचं नशीबच बदलून टाकलं आश्चर्यकारक! चक्क 3 फुटांची गाय 30 किलो वजन घटवलं, अन् अभिनेत्रीला मिळाला बॉलिवूडमध्ये ब्रेक