NCP ची ताकद कायम ठेवण्यासाठी पवार मैदानात; लोकसभा अध्यक्षांसोबत खलबतं
NCP Chief Sharad Pawar met Lok Sabha Speaker Om Birla: दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी (३० जानेवारी) लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. लक्षद्वीपचे बडतर्फ खासदार पी.पी. मोहम्मद फैजल यांच्यावरील कारवाई मागे घ्यावी अशी विनंती यावेळी पवारांनी केली. लक्षद्वीपमधील कवरत्ती जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या निकालाला केरळ उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. […]
ADVERTISEMENT

NCP Chief Sharad Pawar met Lok Sabha Speaker Om Birla: दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी (३० जानेवारी) लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. लक्षद्वीपचे बडतर्फ खासदार पी.पी. मोहम्मद फैजल यांच्यावरील कारवाई मागे घ्यावी अशी विनंती यावेळी पवारांनी केली. लक्षद्वीपमधील कवरत्ती जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या निकालाला केरळ उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता फैजल यांच्यावरील बडतर्फीची कारवाईही मागे घ्यावी, अशी विनंती पवार यांनी ओम बिर्ला यांना केली. (Lok Sabha Speaker Om Birla Lok Sabha Speaker Om Birla met NCP MP P.P. Dismissal action has been taken against Mohammad Faizal)
लक्षद्वीपमधील कवरत्ती जिल्हा आणि सत्र न्यायालयाने पी. पी. मोहम्मद फैजल यांच्यासह चार जणांना खुनी हल्ल्याच्या आरोपात दोषी ठरवलं आहे. यानुसार त्यांना दहा वर्षांच्या तुरुंगवासाची आणि प्रत्येकी एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. २०१३ मधील सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानुसार एखाद्या प्रकरणात लोकप्रतिनिधीला २ वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाली तर त्यांचं पद रद्द होते. त्यानुसार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पी.पी. मोहम्मद फैजल यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली आहे.
Mohammad Faizal : NCPला महाराष्ट्राबाहेर मोठा झटका! फैजलांची खासदारकी गेली
मात्र या निकालाविरोधात पी.पी. मोहम्मद फैजल यांनी केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या खटल्यावरील सुनावणीवेळी केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बेचू कुरियन यांनी निकालात म्हटलं की, सार्वत्रिक निवडणुकीसाठी केवळ दीड वर्ष बाकी आहे. अशावेळी पोटनिवडणूक घेणं म्हणजे वेळेचा अपव्यय ठरणार आहे. निवडणुकीमुळे सर्व प्रशासकीय कामकाज ठप्प होणार आहे. निवडणुकीत खर्च होणारा पैसा हा देशाचा असून या पैशांचाही अपव्यय ठरेल.