NCP ची ताकद कायम ठेवण्यासाठी पवार मैदानात; लोकसभा अध्यक्षांसोबत खलबतं - Mumbai Tak
Mumbai Tak /बातम्या / NCP ची ताकद कायम ठेवण्यासाठी पवार मैदानात; लोकसभा अध्यक्षांसोबत खलबतं
बातम्या राजकीय आखाडा

NCP ची ताकद कायम ठेवण्यासाठी पवार मैदानात; लोकसभा अध्यक्षांसोबत खलबतं

NCP Chief Sharad Pawar met Lok Sabha Speaker Om Birla: दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी (३० जानेवारी) लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. लक्षद्वीपचे बडतर्फ खासदार पी.पी. मोहम्मद फैजल यांच्यावरील कारवाई मागे घ्यावी अशी विनंती यावेळी पवारांनी केली. लक्षद्वीपमधील कवरत्ती जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या निकालाला केरळ उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता फैजल यांच्यावरील बडतर्फीची कारवाईही मागे घ्यावी, अशी विनंती पवार यांनी ओम बिर्ला यांना केली. (Lok Sabha Speaker Om Birla Lok Sabha Speaker Om Birla met NCP MP P.P. Dismissal action has been taken against Mohammad Faizal)

लक्षद्वीपमधील कवरत्ती जिल्हा आणि सत्र न्यायालयाने पी. पी. मोहम्मद फैजल यांच्यासह चार जणांना खुनी हल्ल्याच्या आरोपात दोषी ठरवलं आहे. यानुसार त्यांना दहा वर्षांच्या तुरुंगवासाची आणि प्रत्येकी एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. २०१३ मधील सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानुसार एखाद्या प्रकरणात लोकप्रतिनिधीला २ वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाली तर त्यांचं पद रद्द होते. त्यानुसार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पी.पी. मोहम्मद फैजल यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली आहे.

Mohammad Faizal : NCPला महाराष्ट्राबाहेर मोठा झटका! फैजलांची खासदारकी गेली

मात्र या निकालाविरोधात पी.पी. मोहम्मद फैजल यांनी केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या खटल्यावरील सुनावणीवेळी केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बेचू कुरियन यांनी निकालात म्हटलं की, सार्वत्रिक निवडणुकीसाठी केवळ दीड वर्ष बाकी आहे. अशावेळी पोटनिवडणूक घेणं म्हणजे वेळेचा अपव्यय ठरणार आहे. निवडणुकीमुळे सर्व प्रशासकीय कामकाज ठप्प होणार आहे. निवडणुकीत खर्च होणारा पैसा हा देशाचा असून या पैशांचाही अपव्यय ठरेल.

या सर्व गोष्टीनंतरही निवडणूक पार पडली तर नव्या लोकप्रतिनिधीला केवळ पंधरा महिन्यांचाच कार्यकाळ मिळणार आहे. अशा स्थितीत ही संपूर्ण प्रक्रिया केवळ वेळेचा अपव्यय ठरेल, शिवाय या प्रकरणात कोणतेही धोकादायक शस्त्र जप्त करण्यात आलेलं नव्हतं. जखमींच्या दुखापतीचं स्वरुपही धोकादायक नाही, असंही निरीक्षण उच्च न्यायालयानं नोंदवलं.

Mohammed Faizal P. P : शरद पवारांच्या निकटवर्तीय खासदाराला १० वर्षांची शिक्षा

दरम्यान, सत्र न्यायालयाच्या निकालानंतर निवडणूक आयोगाने देखील लक्षद्वीप मतदारसंघात पोटनिवडणुकीची घोषणा केली होती. मात्र केरळ उच्च न्यायालयाच्या निकालानंतर आयोगाने पोटनिवडणुकीची प्रक्रिया स्थगित केली आहे. पी. पी. मोहम्मद फैजल यांना हा मोठा दिलासा मानला जात आहे. तर त्याचवेळी केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयाला लक्षद्वीप प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर याचिका दाखल करून लवकर सुनावणीची मागणी केली आहे.

वेब सीरीजमधील ‘तो’ गायक ‘जो’ बनला निर्दयी खुनी! IPS पत्नीसोबत IAS पतीची परदेशवारी… दिसतायेत दोघंही लय भारी! Gufi paintal : महाभारतात शकुनी मामा लंगडत का चालायचे? Aditi Rao Hydari घटस्फोटनंतर दुसऱ्या अभिनेत्याच्या प्रेमात! थाटणार संसार? Anil Ambani यांची फिल्मी लव्हस्टोरी! जेव्हा कुटुंबाच्या विरोधात गेले तेव्हा… Reham Khan : इम्रान खान यांच्या EX पत्नीचं तिसरं लग्न, पतीसोबत रोमँटिक अंदाज! तुम्हाला ‘या’ सवयी असतील, तर मुलांवर होईल वाईट परिणाम; वेळीच सावध व्हा! फिटनेस फ्रीक Shilpa Shetty मुलांसोबत मस्ती करताना थकली! यूजर्स म्हणाले.. मालदीवमध्ये Rinku Singh चा स्टायलिश लुक! 6 पॅक अ‍ॅब्सवर सर्वांच्या खिळल्या नजरा! Balasore Train Accident : विरेंद्र सेहवाग ‘त्या’ मुलांचा होणार पालक, केली मोठी घोषणा IPL मधून माहीची बक्कळ कमाई; एका सामन्याची फी जाणून व्हाल हैराण! कतरीना कैफची ‘ही’ सवय आवडत नाही, विक्की कौशलचा खुलासा WTC फायनलपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका, स्टार गोलंदाज बाहेर रेल्वे रूळांमध्ये किंचीत अंतर सोडण्यामागचे कारण काय? बॉक्सऑफिसवर सारा-विकीची हटके जोडी, दुसऱ्या दिवशी कमाईत वाढ! Train accidents : ‘या’ अपघातांनी अवघा भारत हादरला होता, तुम्हाला किती माहितीये? एका Video Call मुळे व्यक्तीला 5 कोटींचा गंडा! चुकूनही ‘हे’ नका करू Mukesh Ambani यांची गोंडस नात!.. घेतलं कुशीत; क्यूट Photos Viral तुमचं मूलही मोबाईल असल्याशिवाय जेवत नाही? होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार.. Adah Sharma : ‘नाकाची सर्जरी करून घे’, जेव्हा अभिनेत्रीला दिला होता सल्ला; म्हणाली..