अमृता फडणवीसांची माफी मागितलेले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष 6 तालुकाध्यक्षांसह शिंदे गटात
नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष आणि माजी उपमहापौर अशोक गावडे यांनी गुरुवारी शिंदे गटात प्रवेश केला. मागील अनेक दिवसांपासून ते शिंदे गटात जातील अशा चर्चा होत्या. अखेरीस त्यांनी नंदनवन बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता शिवसेनेतून आलेल्या नामदेव भगत यांच्यावर राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. […]
ADVERTISEMENT

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष आणि माजी उपमहापौर अशोक गावडे यांनी गुरुवारी शिंदे गटात प्रवेश केला. मागील अनेक दिवसांपासून ते शिंदे गटात जातील अशा चर्चा होत्या. अखेरीस त्यांनी नंदनवन बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता शिवसेनेतून आलेल्या नामदेव भगत यांच्यावर राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
गावडेंसह त्यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका निर्मला गावडे, मुलगी आणि माजी नगरसेविका सपना गावडे, सानपाड्याचे तालुकाध्यक्ष रवींद्र ढोबळे, कोपरखैरणेचे तालुकाध्यक्ष मोहन पाडळे, घणसोलीचे तालुकाध्यक्ष हेमंत पाटील, सीबीडी बेलापूरचे तालुकाध्यक्ष अरुण कांबळे, रबाळेचे तालुकाध्यक्ष महेश बिराजदार, तुर्भेचे तालुकाध्यक्ष नियाज शेख आणि अनेक पदाधिकाऱ्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला.
गावडे आणि पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. माजी मंत्री आणि आमदार गणेश नाईक यांनी सर्व नगरसेवकांसहित भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची नवी मुंबईमधील सारी सूत्र गावडेंकडे सोपविण्यात आली होती. गावडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांचे निकटवर्तीय मानले जात होते. त्यामुळेच पवार यांनी गावडेंकडे सूत्र दिल्याचे बोलले जात होते.
त्यानंतर लगेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात गावडे यांना ताकद देण्याचे काम करण्यात आले होते. तसेच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्याविरोधात उतरविण्यात आले होते. पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवूनही गावडे यांनी म्हात्रे यांना विजयासाठी संघर्ष करायला लावला होता.