चक्क अजित पवारांनी केली राज ठाकरेंची नक्कल, मिश्किल शब्दात लगावले टोले
नाशिक: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या जाहीर भाषणात अनेक नेत्यांच्या नकला करुन त्यांच्यावर टीका करतात हे आपण पाहिलचं आहे. त्यातही उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज ठाकरे यांच्या टार्गेटवर नेहमीच असतात. अनेकदा अजित पवारांची नक्कल करुन राज ठाकरे त्यांच्यावरी टीका करतात. पण आज चक्क अजित पवारांनीच राज ठाकरे यांची नक्कल करत त्यांच्यावर मिश्किल भाषेत टिप्पणी […]
ADVERTISEMENT

नाशिक: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या जाहीर भाषणात अनेक नेत्यांच्या नकला करुन त्यांच्यावर टीका करतात हे आपण पाहिलचं आहे. त्यातही उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज ठाकरे यांच्या टार्गेटवर नेहमीच असतात. अनेकदा अजित पवारांची नक्कल करुन राज ठाकरे त्यांच्यावरी टीका करतात. पण आज चक्क अजित पवारांनीच राज ठाकरे यांची नक्कल करत त्यांच्यावर मिश्किल भाषेत टिप्पणी केली आहे.
नाशिकमधील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. राज ठाकरे हे सरड्यासारखे रंग बदलतात असं म्हणत अजित पवारांनी राज ठाकरेंवर टीकेचे बाण सोडले. पण याचवेळी त्यांनी राज ठाकरे ज्या पद्धतीने त्यांच्या हातातील नॅपकिन कसा वापरतात याचीच नक्कल करुन दाखवली.
पाहा अजित पवारांनी राज ठाकरे यांची नेमकी कशी नक्कल केली:
‘राज ठाकरेंनी पूर्वीचीच कॅसेट पुन्हा लावली आहे. म्हणे पवार साहेब जातीयवादी आहेत. तुम्हा नाशिककरांना माहिती आहे की, पवार साहेब जातीयवादी आहे की नाही. राजू शेट्टी यांनी सांगितलं की, पवार साहेब जातीयवादी नाहीत. रामदास आठवलेंनी पण सांगितलं की, साहेब जातीयवादी नाही. साहेबांची 50 वर्षांची राजकीय कारकीर्द तुमच्यासमोर आहे ना. त्यामध्ये एखादा धादांत खोटं बोलत असेल तर त्याच्या बोलण्याला फार महत्त्व द्यायचं काय कारण?’