सुप्रिया सुळेंनी शिंदे गटाच्या भरत गोगावले यांची थेट अमित शाहांकडे केली तक्रार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाची सुरूवात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातल्या राड्याने झाली. विधानभवनात राज्याच्या जनतेसाठी कायदे केले जातात आणि विधेयकं मांडून निर्णय घेतले जातात. त्याच विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातले आमदार भिडल्याचं पाहण्यास मिळालं. यासंदर्भातली तक्रार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली.

Maharashtra Assembly: ‘आम्हीच धक्काबुक्की केली’; विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमदारांमध्ये राडा का झाला?

विधानभवनाच्या पायऱ्यांवर नेमकं काय घडलं?

विधानभवनाच्या पायऱ्यावर शिवसेनेच्या आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आमदार पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसांपासून शिंदे गटाविरुद्ध घोषणाबाजी होताना दिसतेय. आज शिंदे गटातील आमदारांनी बॅनर घेऊन पायऱ्यांवर घोषणाबाजी सुरू केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि महेश शिंदे यांच्या शाब्दिक खटका उडाला. झटापट सुरू असतानाच धक्काबुक्की करायची नाही, असं अमोल मिटकरी म्हणाले. त्यानंतर रोहित पवार, भरत गोगावले, प्रताप सरनाईक, अजित पवार यांनी मध्यस्थी केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शिंदे गटाचा थेट उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरेंवर निशाणा

शिंदे गटाने थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध मोर्चा उघडला. ‘कोविडच्या भीतीने राजा बसला घरी, हवालदिल जनता फिरली दारोदारी. युवराजांच्या चेल्यांनी लुटली तिजोरी, भ्रष्टाचाराचे खोके पोहोचले यांच्या घरोघरी. पक्ष टिकवण्यासाठी लढणारे गद्दार, पक्ष संपवणारे यांच्यासाठी मोठे खुद्दार. खुर्चीसाठी केले हिंदुत्व हद्दपार, खुर्चीवर बसल्यावर शिवसैनिक केले वेशीपार, खुर्ची गेल्यावर आता फिरतात दारोदार”, असे बॅनर शिंदे गटातील आमदारांनी झळकावले.

धक्काबुक्कीबद्दल बोलताना शिंदे गटाचे भारत गोगावले म्हणाले, “हा तर फक्त ट्रेलर होता. पिक्चर अजून बाकी आहे. ते आम्हाला काय धक्काबुक्की करणार, उलट आम्ही त्या लोकांना धक्काबुक्की केली.” हाच मुद्दा उचलून धरत सुप्रिया सुळेंनी अमित शाह यांच्याकडे तक्रार केली आहे.

ADVERTISEMENT

काय म्हटलं आहे सुप्रिया सुळे यांनी?

गृहमंत्री अमित शाह यांनी शिंदे गटातील आमदार महाराष्ट्र विधानभवन परिसरात खुलेआम महाविकास आघाडीच्या आमदारांबाबत हिंसक वक्तव्य केलं. त्यांना चिथावण्याचं आणि धमकावण्याचं काम करत आहेत. आपल्या भाजप पक्षासोबत युतीत सरकार चालवणाऱ्या या लोकांच्या अशा प्रकारच्या वक्तव्यांची दखल घेतली पाहिजे. पिक्चर अभी बाकी है असं आमदार म्हणत असतील तर मविआच्या आमदारांच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता आणि त्यांच्याबाबत वाढणारा धोका लक्षात घेता त्यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी आमची विनंती आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा लक्षात घेऊन आपण देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करा आणि शिंदे गटातील आमदारांना कायदा आणि लोकशाहीच्या मूल्यांबाबत समज द्या अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT