आंब्याच्या झाडावर दगड मारले जातात, बाभळीच्या नाही; सुप्रिया सुळेंचा राज ठाकरेंना टोला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १ मे रोजी औरंगाबादमध्ये जी सभा घेतली ती अजूनही चर्चेत आहे. या सभेत त्यांनी शरद पवारांना पुन्हा एकदा टार्गेट केलं. शरद पवार हे जाती-पातीचं राजकारण करतात असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे. तसंच राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयता वाढली या आरोपाचाही पुनरूच्चार राज ठाकरेंनी केला आहे. त्या आरोपांना आता खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं आहे.

Supriya Sule: ‘पंतप्रधान मोदींनी आमचं मन दुखावलं’, पाहा सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आंब्याच्या झाडालाच दगड मारतात, बाभळीच्या झाडाला कुणी दगड मारतं का? असा टोला राज ठाकरेंना सुप्रिया सुळेंनी लगावला आहे. एवढंच नाही तर मी यशवंतराव चव्हाण यांच्या संस्कारात तयार झाले आहे. त्यांच्या संस्कारांमध्ये कधीही अल्टिमेटम हा शब्द नव्हता. त्यामुळे मला त्याबद्दल काहीही बोलायचं नाही. यशवंतराव चव्हाणांच्या वागण्यात नम्रता होती. त्यामुळे माझा या शब्दाचा अभ्यास नाही असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

माझ्यासाठी भोंगे नाही तर महागाई आणि सामान्यांना भेडसावणारे प्रश्न महत्त्वाचे-सुप्रिया सुळे

ADVERTISEMENT

काय म्हणाले होते राज ठाकरे?

ADVERTISEMENT

“शरद पवार यांनी शिवाजी महाराजांचं कधीही नाव घेतलं नव्हतं. मी सभेत म्हटल्यावर ते नाव घेऊ लागले. शरद पवार नास्तिक आहेत म्हटल्यावरही त्यांना लागलं, झोंबलं. आपली कन्या लोकसभेत माझे वडील नास्तिक आहेत असं बोललीय. यापेक्षा मी काय पुरावा देऊ. मी माझ्या आजोबांची पुस्तकं वाचली आहेत. ती पुस्तकं शरद पवार यांनी नीट वाचावीत. माझे आजोबा धर्मातल्या चुकीच्या गोष्टींवर बोट दाखवणारे होते, भटभिक्षुकीला विरोध करणारे होते.”

शरद पवारांना हिंदू शब्दाची अ‍ॅलर्जी, औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे बरसले

‘बाबासाहेब पुरंदरेंना वृद्धापकाळात पवारसाहेबांनी त्रास दिला’

बाबासाहेब पुरंदरेंना त्यांच्या वृद्धापकाळात पवारसाहेबांनी त्रास द्यायला सुरुवात केली. केवळ ते ब्राह्मण होते म्हणून त्यांना त्रास दिला गेला. मी कधीही जात पाहून व्यक्तीकडे जात नाही. जात पाहून वाचत नाही. रायगडावरील समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली. त्यांच्याकडे काय ब्राह्मण म्हणून पाहाणार काय? लोकमान्यांनी आपल्या वर्तमानपत्राचं नाव मराठा ठेवलं. हे पवारसाहेब कधी सांगणार नाहीत. हे सत्तेत असताना त्यांनी जेम्स लेनला का भारतात आणलं नाही”, असा सवाल राज ठाकरेंनी विचारला.

शरद पवारांना हिंदू शब्दाची अ‍ॅलर्जी – राज यांचा आरोप

शरद पवारांना हिंदू शब्दाची अ‍ॅलर्जी आहे. ते नेहमी फक्त शाहु-फुले आणि आंबेडकरांचा उल्लेख करतात. नक्कीच महाराष्ट्र हा त्यांचा आहेच, परंतू पहिल्यांदा येतात ते आपले छत्रपती महाराज. परंतू शरद पवार शिवाजी महाराजांचं नाव कधीच घेत नाही. त्यांच्या सभांमध्ये शिवाजी महाराजांचे फोटो कधीच दिसत नाहीत. मी इथे कोणत्याही ब्राम्हणांची बाजू घ्यायला आलेलो नाही. परंतू महाराष्ट्रातल्या 18 पगड जातींमध्ये तुम्ही विष कालवलं आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT