बदल सोडाच, गद्दारांचा बदला घेण्यासाठी सज्ज व्हा! मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेचा नवा नारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई महापालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र शिवसेनेत झालेलं बंड आणि आज होणारा उद्धव ठाकरेंचा गटप्रमुख मेळावा यामुळे वातावरण तापलं आहे. शिवसेनेत जून महिन्यात सर्वात मोठं बंड पाहण्यास मिळालं. त्यानंतर आता शिंदे गट वारंवार ठाकरे गटावर कुरघोडीच्या प्रयत्नात आहे. अशात मुंबईत लागलेलं बॅनर हे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. बदल सोडाच गद्दारांचा बदला घेण्यासाठी सज्ज व्हा असा मजकूर असलेला हा बॅनर आहे.

शिवसेनेचा नवा नारा समोर आला

उद्धव ठाकरेंचा गट आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी तयारीला लागला आहे. गटप्रमुख मेळाव्यासाठी जे बॅनर लावण्यात आलं आहे त्या बॅनरवर बदल सोडाच गद्दारांचा बदला घेण्यासाठी सज्ज व्हा असा नारा शिवसेनेने दिला आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे शिवसेना नव्याने बांधत आहेत, तसंच आपल्या पक्षाला बळकटी आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात हा नवा नारा चर्चेत आहे.

भरत गोगावलेंनी थेट उद्धव ठाकरेंना केलं लक्ष्य; ‘तेव्हाच शिवसेना भवनात बसले असते, तर…’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

बॅनरवर आहे तरी काय?

लक्ष मुंबई महापालिका असं लिहिण्यात आलं आहे. तसंच या बॅनरवर हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा तसंच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो आहे. बदल सोडाच गद्दारांचा बदला घेण्यासाठी सज्ज व्हा असं बॅनरवर म्हटलं आहे.

शिवसेना गटप्रमुखांसाठी आयोजित मेळाव्यासाठी नेस्को मैदानात भव्य तयारी करण्यात आली आहे. यासाठी बॅनर मोठ्या प्रमाणात लावण्यात आलं आहे. अशात हे बॅनर चर्चेत आहेत. २१ जूनला एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं त्यांच्यासोबत ४० आमदार गेले. त्यामुळे शिवसेना फुटली. अर्थातच त्यावेळी असलेलं महाविकास आघाडी सरकार हे अल्पमतात आलं. उद्धव ठाकरे यांनी २९ जूनला राजीनामा दिला. त्यानंतर ३० जूनपासून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. भाजपने त्यांना पाठिंबा दिला.

ADVERTISEMENT

संजय राठोडांच्या मुळावरच उद्धव ठाकरे घालणार घाव, शिवसेनेचा मोठा प्लॅन फुटला

ADVERTISEMENT

या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर राज्यात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण पाहण्यास मिळतं आहे. शिवसेना नक्की कुणाची? हा वाद तर सुप्रीम कोर्टात पोहचला आहे. अशात आज उद्धव ठाकरे हे गटप्रमुखांचा मेळावा घेत आहेत. त्यामध्ये या बॅनरची चर्चा होते आहे. कारण सातत्याने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून एकनाथ शिंदे आणि इतर ४० आमदारांना गद्दार असं संबोधलं जातं आहे. त्याच पार्श्वभूमीवर गद्दारांचा बदला घेण्यासाठी सज्ज व्हा असं आवाहन करण्यात आलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT