नितेश राणेंचं रेट कार्ड? काँग्रेसच्या नेत्याने स्क्रीनशॉट शेअर करत केला पलटवार
महाराष्ट्रात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची एन्ट्री झाल्यावर भाजपसह शिंदे गटातील नेत्यांनी ती यात्रा बंद करा. यात्रा रोखा, अशी मागणी केली होती. राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या विधानामुळे मनसेच्या प्रमुख नेत्यांनी राहुल गांधींच्या सभेजवळ जाऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्नही केला… त्यातच राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या अभिनेते, अभिनेत्री इतर मंडळींचीही चर्चा होऊ लागली… त्यानंतर […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची एन्ट्री झाल्यावर भाजपसह शिंदे गटातील नेत्यांनी ती यात्रा बंद करा. यात्रा रोखा, अशी मागणी केली होती. राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या विधानामुळे मनसेच्या प्रमुख नेत्यांनी राहुल गांधींच्या सभेजवळ जाऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्नही केला… त्यातच राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या अभिनेते, अभिनेत्री इतर मंडळींचीही चर्चा होऊ लागली… त्यानंतर विरोधकांकडून आरोप करण्यात आला की ही यात्रा मॅनेज केलेलं आहे.
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एक स्क्रीनशॉट शेअर करत म्हटलं होतं की, भारत जोडो यात्रेत कलाकारांनी यावं, सहभागी यावं म्हणून पैसे दिले जातात असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता काँग्रेसनंही नितेश राणेंवर पलटवार केलाय.
नितेश राणेंनी ट्विटमध्ये काय म्हटलं होतं वाचा…
“राहुल गांधींच्या यात्रेचं स्टेज मॅनेज केलं जातंय. हा घ्या पुरावा, भारत जोडो यात्रेत येण्यासाठी आणि फिरण्यासाठी कलाकारांना किती पैसे दिले जातात याचा हा पुरावा आहे. सब गोलमाल है भाई! ये पप्पू कभी पास नहीं होगा!!”, असं म्हणत नितेश राणेंनी एक स्क्रिनशॉट शेअर केला होता.
“राहुल गांधींची भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशात आहे. मध्य प्रदेशात राहुल गांधींसोबत 15 मिनिटं चालण्यासाठी अॅक्टरची गरज आहे. अॅक्टरच्या प्रवास आणि राहण्याची सोय आपल्याकडून केली जाईल. प्लिज नोट. यात्रेदरम्यान अॅक्टर आपल्या सोयीनुसार त्याची वेळ निवडू शकतो. फक्त नोव्हेंबर महिन्यासाठीची ही रिक्वायरमेंट आहे. पाहुण्यांच्या १५ मिनिटांच्या उपस्थितीसाठी सर्वोत्तम मानधन दिलं जाईल”, असं या स्क्रीनशॉटमधील मेसेजमध्ये आहे.