पुणे गणेश उत्सवात शिंदे विरूद्ध ठाकरे संघर्षाच्या देखाव्याला पोलिसांचा विरोध, संमती नाकारल्याने वाद

राज्यातील सत्ता संघर्षाचा देखावा दाखवायला पोलिसांनी विरोध केला आहे.
Shinde vs Thackeray clash scene in Pune Ganesh festival
Shinde vs Thackeray clash scene in Pune Ganesh festival

पुण्यात गणेश उत्सवात मोठ्या उत्साहात पार पडतो. कोरोनाच्या दोन वर्षांच्या निर्बंधानंतर गणेश उत्सवाची मोठ्या थाटात तयारी सुरु आहे. पुण्यातील काही गणेश मंडळ हे ज्वलंत प्रश्नांवर भाष्य करणारे जिवंत देखावे दाखवतात. मात्र यंदा हे देखावे वादात अडकताना दिसत आहेत. यापूर्वी संगम तरुण मित्र मंडळांना अफझल खानाचा वध दाखवणाऱ्या देखाव्याला सुरवातीला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र मोठ्या विरोधानंतर पोलिसांना परवानगी द्यावी लागली. आता आणखी एका देखाव्यावरून वाद होताना दिसत आहे. राज्यातील सत्ता संघर्षाचा देखावा दाखवायला पोलिसांनी विरोध केला आहे.

काय आहे प्रकरण?

गणेश उत्सवाला अवघे चार दिवस उरले असताना बुधवार पेठेतील असणाऱ्या नरेंद्र मित्र मंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामधील सत्तां संघर्शाच्या देखावा दाखवण्यासाठी पोलिसांना परवानगी मागितली होती. मात्र देखाव्यावरून वाद निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी देखाव्याला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आयोजक असलेल्या गणेश मंडळाने देखील अधिक वाद न घालता देखावा रद्द केला आहे.

मूर्ती बनून तयार पण देखावा रद्द

अनेक गणेश मंडळ हे सामाजिक, राजकीय विषयावर भाष्य करणारे देखावे आपल्या मंडळात दाखवत असतात. अनेक मंडळ त्यातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतात. स्त्रीभूण हत्या, बेटी बचाव, शेतकऱ्यांची आत्महत्या, यांसारखे विषय घेऊन त्यावर जिवंत देखावा दाखवला जातो. अशाच पद्धतींने राज्यात सध्या सुरु असलेला सत्ता संघर्ष दाखवावा, या हेतूने नरेंद्र मित्र मंडळाने तयारी सुरु केली होती. त्यासाठी लागणारे मूर्ती देखील तयार झाले होते. पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आता हा देखावा दाखवला जाणार नाही.

वादविवाद होईल असं देखाव्यात काही नव्हतं : सतीश तारू

या देखाव्यातून जास्त काही वादविवाद होईल असं नव्हतं. फक्त सत्तासंघर्ष आणि त्यातून एखाद्या कार्यकर्त्याची कशी घुसमट होते, हे त्यातून दाखवायचं होतं. मात्र आता ते दाखवलं जाणार नाही, असं हा देखावा तयार करणारे सतीश तारू यांनी सांगितलं. यासह प्लास्टिक बंदी, कोरोनावर कोरोना योद्धांनी केलेली मात, असे काही देखावे आपण तयार केले आहेत. परंतु त्यापैकी आकर्षक आणि ज्वलंत विषयावर भाष्य करणारा देखावा जो होता तो सत्ता संघर्षचा होता, असं तारू म्हणाले.

अफझल खानाच्या वधाच्या देखाव्याला पहिलं विरोध मग परवानगी

कोथरूड येथील संगम गणेश मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा केलेला वध, हा देखावा दाखवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण सांगून परवानगी नाकारली होती. मात्र पोलिसांच्या या भूमिकेवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे राजकीय वातावरण देखील पेटत होतं. अखेर पोलिसांनी आपली भूमिका बदलत देखाव्याला परवानगी दिली आहे. हा वाद संपत असतानाच आता सत्ता संघर्षाच्या देखाव्याला पोलिसांनी विरोध केला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in