Mumbai Police : देवेन भारती यांची नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात
मुंबई : पोलिसांच्या आजवरच्या इतिहासातील एक मोठा बदल घडवून आला आहे. मुंबई पोलीस दलात आता विशेष पोलीस आयुक्तपद निर्माण करण्यात आलं आहे. या पदावर उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले समजले जाणारे वरिष्ठ अधिकारी देवेन भारती (IPS Deven Bharti) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश आज दुपारी जारी करण्यात आले. नवीन रचनेनुसार, मुंबईतील पाच […]
ADVERTISEMENT

मुंबई : पोलिसांच्या आजवरच्या इतिहासातील एक मोठा बदल घडवून आला आहे. मुंबई पोलीस दलात आता विशेष पोलीस आयुक्तपद निर्माण करण्यात आलं आहे. या पदावर उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले समजले जाणारे वरिष्ठ अधिकारी देवेन भारती (IPS Deven Bharti) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश आज दुपारी जारी करण्यात आले.
नवीन रचनेनुसार, मुंबईतील पाच सहआयुक्त (गुन्हे, कायदा आणि सुव्यवस्था, वाहतूक, प्रशासन आणि आर्थिक गुन्हे शाखा) हे विशेष पोलीस आयुक्तांना उत्तरदायी असणार आहेत. तर विशेष पोलीस आयुक्त हे पोलीस आयुक्त यांना उत्तरदायी राहणार आहेत. मुंबई पोलीस दलात विशेष पद तयार करुन त्यावर देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात यावी यासाठी देवेंद्र फडणवीस हे मागील काही दिवसांपासूनच अनुकूल असल्याचं बोललं जात होतं. अखेर या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालं आहे.
मात्र याच नियुक्तीवरुन देवेंद्र फडणवीस यांच्यावर काँग्रेसने निशाणा साधला आहे. ट्विट करत काँग्रेनं म्हटलं आहे की, आता मुंबईला जसा एका पोलीस आयुक्तासोबत सोबत दुसरा विशेष पोलीस आयुक्त नेमत आहात, तसाचं राज्यासाठी विशेष मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही नेमून टाका, म्हणजे विषयच संपून जाईल. महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेचा सत्यानाश करण्याचा चंगच शिंदे-फडणवीसांनी बांधला आहे.
आता मुंबईला जसा एका पोलीस आयुक्तासोबत सोबत दुसरा विशेष पोलीस आयुक्त नेमत आहात तसाच राज्यासाठी विशेष मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही नेमून टाका म्हणजे विषयच संपून जाईल.
महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेचा सत्यानाश करण्याचा चंगच शिंदे-फडणवीसांनी बांधला आहे. pic.twitter.com/hxV0zCzRbs
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) January 4, 2023