प्रकाश आंबेडकर ‘मविआ’मध्ये येणार? अजित पवारांनी राष्ट्रवादीकडून दिला ग्रीन सिग्नल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी नुकतचं एका व्यासपीठावर एकत्र येत नव्या मैत्रीचे संकेत दिले होते. प्रबोधनकार.कॉम’ या संकेतस्थळाच्या लॉंचिंग कार्यक्रमानिमित्त हे दोन्ही नेते एकत्र दिसून आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी त्यांच्या भाषणांमधून आगामी काळात शिवशक्ती-भीमशक्ती आघाडीचे संकेत दिले.

मागील अनेक दिवसांपासून शिवसेना (ठाकरे गट) – वंचितच्या आघाडीच्या चर्चा आहेत. याबाबत स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी आपण उद्धव ठाकरेंना प्रस्ताव पाठविला असल्याचं सांगितलं आहे. मात्र ठाकरे गट महाविकास आघाडीमध्ये असल्यानं काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेकडेही सर्वांचं लक्ष लागलं होतं. परंतु काँग्रेससोबत आपली चर्चा झाल्याचं आंबेडकर यांनी यापूर्वी अनेकदा सांगितलं होतं. त्यामुळे सर्वांच्या नजरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेकडे लागल्या होत्या.

अशाच आता, समविचारी लोक एकत्र येऊन समोरच्या सत्ताधारी पक्षाचा पराभव करण्यासाठी मतविभागणी होत नसेल तर आमची तयारी आहे, असं म्हणतं राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी वंचित बहुनज आघाडीसोबत आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसही अनुकुल असल्याचं सांगितलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अजित पवार काय म्हणाले?

अजित पवार म्हणाले, समविचारी लोक एकत्र येऊन समोरच्या सत्ताधारी पक्षाचा पराभव करण्यासाठी मतविभागणी होत नसेल तर आमची तयारी आहे. पण तयारी एका बाजूने असून चालत नाही. तयारी दोन्ही बाजूंनी असावी लागते. यापूर्वी अनेकदा आरपीआयमध्ये कवाडे गट, गवई गट, आठवले गट यांच्याशी आघाडी करुन निवडणुका लढविल्या आहेत.

रामदास आठवले तिकडे मंत्री होईपर्यंत ते आमच्यासोबत होते. प्रकाश आंबेडकर यांच्याशीही त्या-त्यावेळी चर्चा करण्याचा प्रयत्न झाला. आर.आर. पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांशी चर्चा केली होती. आम्हीही त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी तयार आहोत.

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

प्रबोधनकार ठाकरे आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी जर समाजाला जागं केलं नसतं तर या समाजाला मान-सन्मान मिळाला नसता. बाबासाहेब होते म्हणून ही एक समानता तयार झाली. एक-एक करत आज आपल्या स्वातंत्र्यावर घाला घातला जात आहे. काल-परवा एक वाद उठला. आज पूर्ण स्वातंत्र्य धोक्यात आलं आहे. त्यामुळे हे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी जे जे सोबत येतील त्यांच्यासोबत आम्ही जाणार, असं म्हणतं उद्धव ठाकरे यांनी आगामी काळात वंचित बहुजन आघाडीसोबत युतीचे संकेत दिले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT