Prakash Mahajan: ”राऊतांवर कारवाई झाल्यापासून शरद पवार शांत तर अजित पवारांची मोघम प्रतिक्रिया”
–रोहित हातांगळे, बीड शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या ईडी कारवाई संदर्भात मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी गौप्यस्फोट केला आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांना घेऊन शरद पवार (Sharad Pawar) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या भेटीला गेले होते. ती भेट ईडीने वक्रदृष्टी करू नये म्हणून होती. संजय राऊतांवर कारवाई केल्यानंतर शरद पवार शांत […]
ADVERTISEMENT

–रोहित हातांगळे, बीड
शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या ईडी कारवाई संदर्भात मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी गौप्यस्फोट केला आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांना घेऊन शरद पवार (Sharad Pawar) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या भेटीला गेले होते. ती भेट ईडीने वक्रदृष्टी करू नये म्हणून होती. संजय राऊतांवर कारवाई केल्यानंतर शरद पवार शांत आहेत तर अजित पवार मोघम प्रतिक्रिया देत आहेत, छगन भुजबळ यांनी तर सांगितले आहे ईडीच्या केसमध्ये जामीन होत नाही असे प्रकाश महाजन म्हणाले आहेत.
राहुल गांधी आणि प्रियंका गांधींचे ट्विट, शरद पवार गप्प?
संजय राऊत यांना ईडीने 1 ऑगस्ट रोजी अटक केली. 8 ऑगस्टपर्यंत त्यांनाा ईडी कोठडी ठोठावण्यात आली आहे. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचीही चौकशी ईडी करणार आहे. संजय राऊतांसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी ट्विट केले आहे. संजय राऊत यांना समर्थन दिले आहे. त्याचबरोबर शरद पवार यांनी फोनकरुन चौकशी केल्याचे सुनील राऊत यांनी सांगितले आहे. परंतु शरद पवारांनी माध्यमांसमोर जाहीर प्रतिक्रिया दिलेली नाही, त्यामुळे राष्ट्रवादी गप्प का असा प्रश्न विचारला जात आहे.
राज ठाकरेंनी जाहीर भाषणात दिले होते ‘हे’ संकेत
१२ एप्रिल २०२२ ला झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्याविषयी एक वक्तव्य केलं होतं. ” मी त्यांच्या वाढदिवसाच्या भाषणाच्या वेळी बोललो होतो, शरद पवार खुश झाले की भीती वाटायला लागते. शरद पवार हल्ली संजय राऊत यांच्यावर खुश आहेत. कधी टांगलेला दिसेल कळणार पण नाही.”