presidential election : राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलै रोजी मतदान पार पडलं. देशभरातील खासदार आणि विधानसभेच्या आमदारांनी मतदान केलं. राष्ट्रपती निवडणुकीत ९९ टक्के मतदान झालं असून, महाराष्ट्रातील काही खासदारांसह देशातील १३ आमदार, खासदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला नाही.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीप्रमाणे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकूण ४ हजार ८०९ मतांपैकी ४ हजार ७९६ मतं पडली. ९९ टक्के मतदान झालं असून, याचाच अर्थ देशातील १३ आमदार, खासदारांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान केलं नाही.
१) अतुल सिंह (सध्या तुरुंगात आहेत)
२) संजय धोत्रे (आजारी असल्यानं आयसीयूमध्ये आहेत)
३) सनी देओल (शस्त्रक्रियेसाठी परदेशात आहे)
४) गजानन किर्तीकर (प्रकृती बरी नाही)
५) हेमंत गोडसे
६) फजलुर रहमान
७) सादिक मोहम्मद
८) इम्तियाज जलील
१) नैना सिंह चौटाला (जेजेपी आमदार परदेशात आहेत)
२) राजकुमार राऊत (भारतीय ट्रायबल पक्ष, राजस्थान)
३) भंवर लाल शर्मा (काँग्रेस, राजस्थान)
४) सत्येंद्र जैन (आप, दिल्ली. सध्या तुरुंगात आहेत.)
५) हाजी युनूस (आप, दिल्ली)
राष्ट्रपती निवडणुकीत छत्तीसगढ, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, सिक्कीम, तामिळनाडू, पुदुच्चेरी या राज्यात शंभर टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.
राष्ट्रपतीपदासाठी मतदान झाल्यानंतर राज्यसभेचे महासचिव पीसी मोदी म्हणाले, संसद भवनात एकूण ९९.१८ टक्के मतदान झालं आहे. निवडून आलेल्या ७३६ लोकप्रतिनिधींपैकी ७३० सदस्यांनी मतदान केलं.
१८ जुलैला मतदान झाल्यानंतर आता प्रतिक्षा आहे, ती २१ जुलैची. २१ जुलै रोजी राष्ट्रपती निवडणुकीची मतमोजणी होऊन निकाल घोषित केला जाणार आहे. त्यामुळे १५वे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा होणार हे २१ जुलैला स्पष्ट होईल. त्यानंतर २५ जुलै रोजी नवे राष्ट्रपती पदाची शपथ घेतील.