India Today Conclave 2023 : PM मोदी इंडिया टुडे कॉन्क्लेव्हला करणार संबोधित
India Today Conclave 2023 : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) येत्या 17 आणि 18 मार्च रोजी दिल्लीत आयोजित इंडिया टुडे कॉन्क्लेव्हला संबोधित करणार आहेत. इंडिया टुडे कॉन्क्लेव्हचे (India Today Conclave 2023) हे २० वे वर्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापूर्वीही इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये उपस्थिती दर्शविली आहे. याआधी २०१९ मध्ये म्हणजेच कोरोना महामारीपूर्वी […]
ADVERTISEMENT

India Today Conclave 2023 :
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) येत्या 17 आणि 18 मार्च रोजी दिल्लीत आयोजित इंडिया टुडे कॉन्क्लेव्हला संबोधित करणार आहेत. इंडिया टुडे कॉन्क्लेव्हचे (India Today Conclave 2023) हे २० वे वर्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापूर्वीही इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये उपस्थिती दर्शविली आहे. याआधी २०१९ मध्ये म्हणजेच कोरोना महामारीपूर्वी पंतप्रधान मोदींनी या कॉन्क्लेव्हला संबोधित केलं होतं. (Prime Minister Narendra Modi will address the India Today Conclave 2023.)
पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक मानले जातात. एकीकडे आर्थिक आणि राजकीय उलाथपालथ आणि दुसरीकडे भारतात पुढील वर्षी लोकसभा निवडणूक होणार असल्याने पंतप्रधान मोदींच्या या संबोधनाला महत्व प्राप्त झालं आहे. कोरोना काळानंतर संपूर्ण जग आर्थिक संकटाचा सामना करत आहे. त्याचवेळी भारत मात्र या संकटातून मजबुतीने बाहेर पडला आणि जगासाठी एक आशेचा किरण होऊन समोर आला. २०२३ मध्ये भारताने जगभरात महत्वाचं स्थान घेतलं आहे. भारत या वर्षी स्वच्छ ऊर्जा आणि आर्थिक सुधारणांवर लक्ष केंद्रीत करणाऱ्या G20 शिखर परिषदेचेही यजमानपद भूषवत आहे.
इंडिया टुडे ग्रुपचे उपाध्यक्ष कली पुरी यांच्या मते, कॉन्क्लेव्हमधील पंतप्रधान मोदींचे संबोधन त्यांच्या नेतृत्वाची दिशा आणि रणनीती स्पष्ट करणारे असणार आहे.