शिंदे गटाला मनसेत विलीन करून घेणार?; राज ठाकरेंच्या विधानाचा अर्थ काय?

शिवसेनेविरोधात बंडखोरी करणारा शिंदे गट मनसेत विलीन होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. याच चर्चेवर राज ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली.
Raj Thackeray on eknath shinde camp Merger in MNS
Raj Thackeray on eknath shinde camp Merger in MNS

एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून बाजूला सारत शिवसेनेचे 40 आमदार फोडले. पण फोडलेले आमदार ठेवणार कुठं असा पेच पक्षांतरबंदी कायद्यामुळे निर्माण झालाय. याच पेचाच्या पार्श्वभूमीवर एका ठाकरेंना सोडून बंडखोर दुसऱ्या ठाकरेंकडे जातील, आणि पेचमुक्त होतील, अशा चर्चा सुरू आहेत. अशातच आता खुद्द मनसेप्रमुख राज ठाकरेंनी विलीनीकरणाबद्दल मौन सोडलंय आणि यातूनच महाराष्ट्रात आणखी मोठा भूकंप घडण्याची शक्यता वर्तवली जातेय.

ठाकरेंना पायउतार व्हावं लागलेल्या महाराष्ट्रातल्या सत्तांतरावर राज काय प्रतिक्रिया देतात याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. मनसेप्रमुख राज ठाकरेंनी शनिवारी झी 24 तास या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सत्तांतरावर सविस्तर भाष्य केलं. शिंदे गट मनसेमध्ये विलीन होणार का या प्रश्नावरही मोठं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय.

राज ठाकरे काय म्हणाले?

प्रश्न - अशी चर्चा आहे, की सद्यस्थितीत मनसेमध्ये जे 40 बंडखोर आमदार आहेत ते विलीन करून घेण्याचा प्रयत्न केला जाईल, प्रस्ताव आला तर या 40 आमदारांना स्वीकाराल का?

राज ठाकरे - शेवटी ही सर्व माझ्याबरोबर काम केलेली लोक आहेत पूर्वीची. हा झाला सगळा टेक्निकल भाग. तुम्ही बोलताय तशा बातम्या मीही ऐकल्या आहेत. टेक्निकल मला काही फार माहिती नाही. समजा त्यांच्याकडून अशा प्रकारची काही गोष्ट आली तर नक्की विचार करेन.

प्रश्न - असं नाही वाटत की यामुळे तुमचा जो कार्यकर्ता आहे त्याला दुजाभाव दिला जाईल?

राज ठाकरे - अजिबात नाही. माझ्यासाठी सर्वप्रथम माझा महाराष्ट्र सैनिक आहे बाकीचे नंतर.

Raj Thackeray on eknath shinde camp Merger in MNS
Raj Thackeray: ''बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंच्या जवळचे 'बडवे' सारखेच, मीही त्याचमुळे बाहेर पडलो''

राज ठाकरे यांच्या शिंदे गटाबद्दलच्या भूमिकेचा अर्थ काय?

शिंदे गटाबद्दल राज ठाकरे यांनी जी भूमिका मांडली, त्यांचा अर्थ राज ठाकरे शिंदे गटाला मनसेत समाविष्ट करुन घेण्यासाठी सकारात्मक असल्याचं दिसतंय. आता राज ठाकरे केवळ एकनाथ शिंदेंकडून ऑफरच्या प्रतिक्षेत आहेत. पण शिंदे खरंच राज ठाकरेंच्या मनसेत विलीन होणार का, हा खरा प्रश्न आहे.

Raj Thackeray on eknath shinde camp Merger in MNS
शिंदे गटाला मनसेमध्ये सामील करुन घेणार? राज ठाकरेंनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले...

कारण शिंदेंकडून शिवसेनाच ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात. तसे प्रयत्न होताना दिसत आहेत. पण विलीनीकरण झालं नाही, तरी येत्या काळात राज -शिंदे गटातली जवळीक वाढणार आहे, हे मात्र या विधानावरून स्पष्ट झालंय.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in