राज ठाकरे शिंदे गटाला पक्षात घेण्यास तयार; मनसेच्या भूमिकेवर उद्धव ठाकरे काय म्हणाले?
मुंबई: शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) हस्ते आज काळाचौकी इथे शिवसेनेच्या शाखेचे उद्धाटन पार पडले आहे. शाखेचे उद्धाटन झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी उपस्थित शिवसैनिकांशी संवाद साधला. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या कालच्या वक्तव्याचा देखील समाचार घेतला आहे. काय म्हणाले उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरे म्हणाले ”अनेक कायदेपंडीतांशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितले की पक्षांतर बंदी कायद्यानुसार या बंडखोरांना […]
ADVERTISEMENT

मुंबई: शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) हस्ते आज काळाचौकी इथे शिवसेनेच्या शाखेचे उद्धाटन पार पडले आहे. शाखेचे उद्धाटन झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी उपस्थित शिवसैनिकांशी संवाद साधला. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या कालच्या वक्तव्याचा देखील समाचार घेतला आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरे म्हणाले ”अनेक कायदेपंडीतांशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितले की पक्षांतर बंदी कायद्यानुसार या बंडखोरांना कोणत्यातरी पक्षात जावं लागणार आहे. आणि कालच एकाने त्यांना त्यांच्या पक्षात घेण्याची कबुली दिली आहे. काल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंना (Raj Thackeray) झी २४ तासच्या मुलाखतीमध्ये विचारले असता राज म्हणाले की त्यांच्याकडून प्रस्ताव आला तर मी विचार करेन. त्याच वक्तव्याचा आधार घेत उद्धव ठाकरेंनी टोला लगावला आहे.
उद्धव ठाकरेंनी सांगितलं २०१९ मध्ये काय घडलं होतं?
उद्धव ठाकरेंनी २०१९ मध्ये भाजपसोबत काय ठरलं होतं हे सांगितले आहे. जे तुम्ही आता म्हणत आहात की शिवसैनिक मुख्यमंत्री केला, मग आम्ही अडीच वर्षांपुर्वी हेच सांगत होतो की अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री करा. आज तुम्ही मनावर दगड ठेवून जे केले आहे त्यांची वेळ नसती आली.
२०१९ ला सगळंच (जागा आणि मंत्रीपदं) ५०-५० टक्के द्यायचं ठरलं होतं आणि मुख्यमंत्री पद अडीच-अडीच वर्ष द्यायचं ठरलं होतं, मग तेव्हा म्हणाले होते हे होऊ शकत नाही आता कसंकाय झालं. सध्या ते शिवसेना फोडण्यासाठी पैशांचा वापर करत आहेत, त्यांच्याकडे पैसा आहे तर माझ्याकडे निष्ठा आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.