Rajya Sabha:”शिवसेनेचं ढोंगी हिंदुत्व उघडं पडलं!”MIM च्या पाठिंब्यानंतर मनसेची टीका

मुंबई तक

राज्यसभेच्या निवडणुकीचा धुरळा सुरू झाला आहे. महाराष्ट्रात सहा जागांसाठी सात उमेदवार आहेत. सहाव्या जागेसाठी चुरस आहे. ही चुरस शिवसेना आणि भाजपमध्ये आहे. एक-एक मत अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं आहे. विधानसभेचे आमदार या निवडणुकीत मतदान करतात. अपक्ष आमदारांची मतं, इतर छोट्या पक्षांची मतं मिळवण्यासाठी प्रयत्न केले गेले. आज सकाळी एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी ट्विट करून महाविकास […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

राज्यसभेच्या निवडणुकीचा धुरळा सुरू झाला आहे. महाराष्ट्रात सहा जागांसाठी सात उमेदवार आहेत. सहाव्या जागेसाठी चुरस आहे. ही चुरस शिवसेना आणि भाजपमध्ये आहे. एक-एक मत अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं आहे. विधानसभेचे आमदार या निवडणुकीत मतदान करतात. अपक्ष आमदारांची मतं, इतर छोट्या पक्षांची मतं मिळवण्यासाठी प्रयत्न केले गेले. आज सकाळी एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी ट्विट करून महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याचं जाहीर केलं आहे. ज्यानंतर मनसेने शिवसेनेवर टीका केली आहे.

मनसेचे नेते गजानन काळे यांनी काय म्हटलं आहे?

राज्याची शोभा होईल अशी ही राज्यसभा निवडणूक सुरू आहे. जनता असंख्य अडचणींचा सामना करत असताना सत्ताधाऱ्यांचा पंचतारांकित निवडणुकीचा खेळ सुरू आहे. त्या निजामाची अवलाद एमआयएमची मदत घेऊन जनाची नाही पण मनाचीही महाविकास आघाडीने सोडली आहे तर शिवसेनेचं नकली,ढोंगी हिंदुत्व उघडं पडलं आहे. असं म्हणत गजानन काळे यांनी महाविकास आघाडीवर आणि शिवसेनेवर टीका केली आहे.

मनसेचे नेते राज ठाकरे यांनीही उद्धव ठाकरेंवर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर टीका केली होती. ठाणे, पुणे तसंच औरंगाबाद यां ठिकाणी झालेल्या सभांमध्येही त्यांनी या सगळ्या गोष्टींवरून शिवसेनेवर टीका केली होती. आता एमआयमचा पाठिंबा घेतल्यानंतर चांगलीच टीका करण्यात आली आहे.

हे वाचलं का?