Rajya Sabha Election: महाविकास आघाडीचं बळ वाढलं, Imtiyaz Jaleel यांनी जाहीर केला पाठिंबा

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यसभा निवडणुकीच्या दिवशी महाविकास आघाडीचं बळ वाढलं आहे. कारण एमआयएमने आपला पाठिंबा महाविकास आघाडीला जाहीर केला आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी गुरूवारी शिवसेनेच्या (Shiv Sena) नेत्यांची भेट घेतली. ट्रायंडट हॉटेलमधून रात्री एकच्या दरम्यान ते तिथे होते.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde), अनिल परब, खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत आणि मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत त्यांची चर्चाही झाली. त्यानंतर जलील यांनी त्यांचा पाठिंबा महाविकास आघाडीला दिलाय. एक एक मत महत्त्वाचं मानलं जातंय. अशात आजच्या दिवशी एमआयएमचा पाठिंबा महाविकास आघाडीला मिळणं ही मोठी बाब आहे.

काय म्हटलंय जलील यांनी

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

भाजपचा पराभव करण्यासाठी आमच्या पक्षाने महाविकास आघाडीसाठी मतदान करण्याचं ठरवलं आहे. राज्यसभा निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा देणार आहोत. आमच्या राजकीय भूमिका वेगवेगळ्या आहेत. तसंच काही मतभेदही आहेत. मात्र भाजपला हरवावं या उद्देशाने आम्ही शिवसेनेचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीला मतदान करतो आहोत असं इम्तियाज जलील यांनी जाहीर केलं आहे.

संपूर्ण राज्याचं तसंच देशाचं लक्ष लागलेली राज्यसभा निवडणूक आज पार पडते आहे. राज्यात निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. सहा जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये भाजपचे दोन, शिवसेना एक, राष्ट्रवादी एक आणि काँग्रेस एक असे उमेदवार निवडून येतील हे निश्चित आहे. मात्र सहाव्या जागेसाठी चुरस रंगणार आहे. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी या जागेसाठी उमेदवार दिला आहे.

ADVERTISEMENT

राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान कसं होतं? आमदारांना कोणत्या गोष्टी कराव्या लागतात?

ADVERTISEMENT

आज पार पडत असलेल्या या मतदानासाठी क्रॉस व्होटिंग किंवा मतं फुटू शकतात ही भीती सगळ्याच पक्षांना आहे. त्यामुळे शिवसेनेने पक्षातल्या आमदारांना व्हीप जारी केला आहे. प्रत्येक पक्ष खबरदारी घेताना दिसतो आहे. त्यामुळेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तसंच भाजपने आपल्या आमदारांना मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये ठेवलं आहे.

आज राज्यातील राज्यसभेच्या जागांसाठी सकाळी ९ ते ४ या वेळेत मतदान होणार आहे. तर संध्याकाळी पाच वाजल्यापासून मत मोजणी सुरू होणार आहे. या निवडणुकीत विधानसभेचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी मतदार असतात. मात्र एका आमदाराचं निधन झालंय. तर अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना कोर्टाने मतदानाचा अधिकार दिलेला नाही. त्यामुळे २८५ मतदार सहा जागांसाठी मतदान करतील.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT