राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडूंनी वाढवलं उद्धव ठाकरेंचं टेन्शन; धक्का देणार?
राज्यसभा निवडणुकीची उत्कंठा दिवसेंदिवस वाढत आहे. भाजपविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत असून, दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेनेकडून बेरजेचं राजकारण सुरू आहे. मात्र, त्यातच आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिवसेनेचं टेन्शन वाढवलं आहे. बच्चू कडूंनी धान आणि हरभऱ्याच्या अनुदानाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडलं आहे. राज्याचे राजकारण राज्यसभा निवडणुकीभोवती फिरताना दिसत आहे. आमदारांचा घोडेबाजार होणार नाही, याची […]
ADVERTISEMENT

राज्यसभा निवडणुकीची उत्कंठा दिवसेंदिवस वाढत आहे. भाजपविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत असून, दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेनेकडून बेरजेचं राजकारण सुरू आहे. मात्र, त्यातच आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिवसेनेचं टेन्शन वाढवलं आहे. बच्चू कडूंनी धान आणि हरभऱ्याच्या अनुदानाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडलं आहे.
राज्याचे राजकारण राज्यसभा निवडणुकीभोवती फिरताना दिसत आहे. आमदारांचा घोडेबाजार होणार नाही, याची काळजी घेत शिवसेना-भाजपकडून अपक्षाच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच बच्चू कडूंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे धान आणि हरभऱ्याच्या अनुदानाचा मुद्दा उपस्थित केलाय.
राज्यसभा निवडणूक : भाजपमुळे शिवसेनेनं आमदारांचं हॉटेल बदललं, मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बच्चू कडूंनी राज्यसभा निवडणुकीवरून इशारा दिला. धान आणि हरभऱ्याच्या अनुदानाची व्यवस्था केंद्र आणि राज्य सरकारनं करावी, अन्यथा त्याचे परिणाम राज्यसभेच्या मतदानावर दिसतली, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.