Ramdas Kadam: “नारायण राणे गेले तेव्हा तुमची #@ पिवळी झाली”, ठाकरेंवर वार
Ramdas Kadam Reaction On Uddhav Thackeray Khed Rally : रामदास कदमांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेडमध्ये उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. या सभेत उद्धव ठाकरेंनी रामदास कदम यांच्यावर टीका केली. ठाकरेंच्या या टीकेनंतर रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर भ्रष्टाचाराचे आरोप करत वार केला. भूतकाळातील काही गोष्टींचा उल्लेख करत कदमांनी ठाकरेंवर प्रहार केला. (Ramdas Kadam Hits Out […]
ADVERTISEMENT

Ramdas Kadam Reaction On Uddhav Thackeray Khed Rally : रामदास कदमांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेडमध्ये उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. या सभेत उद्धव ठाकरेंनी रामदास कदम यांच्यावर टीका केली. ठाकरेंच्या या टीकेनंतर रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर भ्रष्टाचाराचे आरोप करत वार केला. भूतकाळातील काही गोष्टींचा उल्लेख करत कदमांनी ठाकरेंवर प्रहार केला. (Ramdas Kadam Hits Out Uddhav Thackeray)
उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं. “खेडचा सगळा विकास मी केला म्हणूनच खेडची ओळख रामदास कदमचा बालेकिल्ला अशी आहे. उद्धवजींना हे माहिती नसेल, शिवसेनाप्रमुखांना माहिती होतं. काल जो इथं राजकीय शिमगा झाला, त्यात खेडची लोक किती होती. त्यात मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, रायगड येथून लोक आणली.”
रामदास कदम पुढे म्हणाले, “उद्धव साहेब तुम्ही एकदा नव्हे, शंभर वेळा खेडमध्ये आलात, तरी योगेश कदमांना तुम्ही पाडू शकणार नाही. माझ्या मुलाला संपवण्याचा तुम्ही प्रचंड प्रयत्न केला. मला तर तुम्ही राजकारणातून संपवणारच होता. मला तुम्ही सांगितलं होतं की, कुठल्या मीडियासमोर जायचं नाही. मला बंदी केली होती. अनेक गोष्टी आहेत. मी पुस्तकात लिहिणार आहेत.”
उद्धव ठाकरेंसह सगळ्यांची अयोध्येतील सगळी व्यवस्था मी केली -रामदास कदम
“अयोध्येला जेव्हा उद्धवजी निघाले होते, तेव्हा तिथे सगळ्या लोकांची सगळी व्यवस्था मी केली होती. संजय राऊत यांचे साक्षीदार आहेत. पण, आदल्या दिवशी उद्धवजी तुम्ही बोलवून घेतलं आणि सांगितलं की, अयोध्येला यायचं नाही. मला कारण कळलं नाही. बाळासाहेब गेल्यानंतर माझी भाषणं तुम्ही बंद करून टाकली. कारण मला कळलं नाही”, असं रामदास कदम म्हणाले.