Ramesh Patil: “आमच्याकडे गुजरातची वॉशिंग पावडर”, भाजप आमदारांचं विधान

मुंबई तक

Ramesh Patil statement On bhushan desai: ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होतात, ते भाजपमध्ये गेल्यानंतर स्वच्छ होतात का?, असा प्रश्न विरोधकांकडून सातत्यानं उपस्थित केला जात आहे. अलिकडेच ठाकरे गटातील नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावरून चर्चा सुरू आहे. याच मुद्द्यावर बोलताना भाजपचे आमदार रमेश पाटील यांनी विधान परिषदेत मोठं विधान केलं. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Ramesh Patil statement On bhushan desai: ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होतात, ते भाजपमध्ये गेल्यानंतर स्वच्छ होतात का?, असा प्रश्न विरोधकांकडून सातत्यानं उपस्थित केला जात आहे. अलिकडेच ठाकरे गटातील नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावरून चर्चा सुरू आहे. याच मुद्द्यावर बोलताना भाजपचे आमदार रमेश पाटील यांनी विधान परिषदेत मोठं विधान केलं. या विधानाने विरोधकांना आयत कोलीत मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

भाजपचे विधान परिषदेतील आमदार रमेश पाटील यांनी केलेल्या विधानाने राजकारण तापण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षातील नेत्यांवर सुरू असलेल्या केंद्रीय यंत्रणांच्या कारवायांवरून विरोधकांकडून मोदी सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं जात असताना रमेश पाटील यांनी केलेल्या विधानामुळे भाजप कोंडीत सापडला आहे.

रमेश पाटील काय म्हणाले?

विधान परिषदेत बोलताना भाजपचे आमदार रमेश पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केलेल्या भूषण देसाईंबद्दलच्या विधानावर भाष्य केलं. ते म्हणाले, “कुणीतरी काल सांगितलं की, एमआयडीसीच्या प्लॉटची 400 कोटींची फाईल आहे म्हणून ते शिवसेनेत आले. पण ते त्यासाठी इथे आलेले नाहीत. हे सरकार चांगलं काम करत आहे. चांगला न्याय देत आहे म्हणून ते इथे आले आहेत. आमच्याकडे निरमा वॉशिंग पावडर आहे. ती गुजरातमधून येते. त्यामुळे आम्ही साफसफाई करून घेतो. जो माणूस आमच्याकडे येईल, तो स्वच्छ होणार आहे”, असं रमेश पाटील म्हणाले.

Bhushan Desai: ‘एक चूक महागात पडू शकते’, भाजप नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

हे वाचलं का?

    follow whatsapp