उद्धव ठाकरेंनी परत बोलावलं तर जाणार का?; दीपक केसरकरांनी ठेवल्या दोन अटी

दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांना काही अटी घातल्या आहेत वाचल्या का?
उद्धव ठाकरेंनी परत बोलावलं तर जाणार का?; दीपक केसरकरांनी ठेवल्या दोन अटी

तब्बल दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदारांनी बंडखोरी केल्यानं शिवसेनेला जोरदार झटका बसलाय. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली हे आमदार सत्तेत आले आहेत. सत्तांतरानंतर आमदारांकडून पुन्हा मातोश्रीवर जाण्याचे संकेत दिले जाताहेत. शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनीही उद्धव ठाकरेंनी बोलावल्यास परत जाऊ, म्हणत काही अटी ठेवल्या आहेत.

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयातील आपल्या कार्यालयात जाऊन पदभार घेतला. यावेळी अनेकजण उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी पदभार घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना दिपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंसोबत समेट घडवून आणण्याबद्दलच्या प्रश्नावर भूमिका स्पष्ट केली.

उद्धव ठाकरेंनी परत बोलावलं तर जाणार का?; दीपक केसरकरांनी ठेवल्या दोन अटी
'आम्ही जा म्हटलेलं नव्हतं, पण आता...'; शिवसेना आमदाराचं बंडखोर आमदारांना प्रत्युत्तर

उद्धव ठाकरेंनी परत बोलावलं तर तुमची भूमिका काय असणार? या प्रश्नावर बोलताना दिपक केसरकर म्हणाले, "मी तुम्हाला एवढंच सांगितलं की, जेव्हा कुटुंबामध्ये असा प्रसंग येतो. आता काय झालंय की, आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आम्ही सर्व आमदार आणि भाजप सत्तेमध्ये आलो आहेत. म्हणजे एक प्रकार कुटुंब तयार झालं आहे."

"आता या कुटुंबातून त्या कुटुंबात परत जायचं असेल, तर आता आम्ही एकटे नाहीये. आमच्यासोबत भाजपसुद्धा आहे. आम्हाला बोलवताना त्यांना भाजपसोबतही चर्चा करावी लागेल. आम्हाला आशीर्वाद द्यावे लागतील," असं म्हणत भाजपसोबत पुन्हा जुळवून घेण्याची मागणी दिपक केसरकर यांनी शिंदे गटाच्या वतीने केलीये.

उद्धव ठाकरेंनी परत बोलावलं तर जाणार का?; दीपक केसरकरांनी ठेवल्या दोन अटी
शिवसेनेत बंडाची ठिणगी कधी पडली?, शहाजीबापूंनी दिलं सांगितली पडद्याआडची गोष्ट
"हे घडण्याला जे लोक जबाबदार आहेत, अशा लोकांना शिवसेनेतून काढून टाका असं म्हणत नाहीये, पण त्यांना बाजूला ठेवा. अशी अनेक लोक आहेत," असं सांगत केसरकर यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या नेत्यांवर निशाणा साधला.

"ज्यावेळी आम्ही कामं घेऊन यायचो, त्यावेळी काही लोक यायचे आणि सांगायची की ही कामं आमच्याकडे द्या, आम्ही उद्धव ठाकरेंना सांगतो. आम्ही यासाठी आमदार झालेलो नाही. आमदार म्हणून आमचा अधिकार कुणाचा मुख्यमंत्र्यांचा. ते आमचे प्रतिनिधी असतात."

"आम्ही आमचा अर्ज त्यांच्या हातामध्ये देऊ. योग्य व्यक्तीच्या हाती दिल्याचं आम्हाला समाधान असतं. कुणीतरी एजंटमध्ये येईल आणि म्हणेल की अर्ज माझ्याकडे द्या, तर त्याचा अधिकार नाहीये. मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. कुणाला देता येत नाही," असं दिपक केसरकर यांनी म्हटलंय.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in