Andheri By Poll : ठाकरेंची ताकद वाढली; CPI पाठोपाठ संभाजी ब्रिगेडची मिळाली सोबत

ऋत्विक भालेकर

मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणूक जवळ आली असल्याने आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही नवीन समीकरण जुळताना पाहायला मिळत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला बुधवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पाठिंबा जाहीर केला होता. त्यापाठोपाठ आता संभाजी ब्रिगेडनेही ऋतुजा रमेश लटके यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्याचे पत्र ठाकरे गटाचे प्रमुख […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणूक जवळ आली असल्याने आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही नवीन समीकरण जुळताना पाहायला मिळत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला बुधवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पाठिंबा जाहीर केला होता. त्यापाठोपाठ आता संभाजी ब्रिगेडनेही ऋतुजा रमेश लटके यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्याचे पत्र ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आलं.

संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी संघटनेचे अध्यक्ष मनोज आखरे यांचे पत्र ट्विट करुन याबाबत ट्विटरवरुन माहिती दिली. या पत्रात म्हटलं आहे की, शिवसेना व संभाजी ब्रिगेड ही नव्याने झालेली युती आहे. या युतीचा धर्म जोपासत संभाजी ब्रिगेडच्यावतीने अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीत शिवसेना पक्षाने दिलेले उमेदवार श्रीमती ऋतुजा रमेश लटके यांना जाहीर पाठिंबा देत आहोत. तसेच संभाजी ब्रिगेड या निवडणुकीत आपल्या सोबत सक्रीय सहभाग नोंदवून पूर्ण ताकदीने उमेदवार निवडून आणण्यास कटिबध्य राहील.