Rajya Sabha Election: संभाजीराजे छत्रपतींची मोठी घोषणा, 'या' जागेवरुन अपक्ष लढणार!
sambhajiraje big announcement independent elections will be fought in rajya sabha elections kolhapur(फाइल फोटो)

Rajya Sabha Election: संभाजीराजे छत्रपतींची मोठी घोषणा, 'या' जागेवरुन अपक्ष लढणार!

SambhajiRaje Rajya Sabha Election: खासदार संभाजीराजे हे राज्यसभेसाठी निवडणूक लढवणार असून त्याबाबतची घोषणा आजच्या पत्रकार परिषदेत केली आहे.

पुणे: खासदार संभाजीराजे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. याआधी राष्ट्रपती नियुक्त खासदार असलेले संभाजीराजे हे आता थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. याबाबतची घोषणा त्यांनी केली आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी जुलै महिन्यात निवडणूक होणार आहे. याच निवडणुकीतील सहाव्या जागेसाठी संभाजीराजे अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. याशिवाय त्यांनी आणखी एक मोठी घोषणा देखील केली आहे.

संभाजीराजे राज्यसभेची आगामी निवडणूक ही अपक्ष म्हणून लढवत असले तरी आजच्याच पत्रकार परिषदेत त्यांनी दुसरी मोठी घोषणा केली ती म्हणजे, त्यांच्या नव्या 'स्वराज्य' या संघटनेची त्यांनी घोषणा केली आहे. याच संघटनेबाबत ते असंही म्हणाले की, 'उद्या स्वराज्य ही संघटना राजकीय पक्षात रूपांतर झाल तर वावग समजू नका.' त्यामुळे आता संभाजीराजे यांच्या अधिकृतरित्या राजकीय वाटचालीला सुरुवात झाली आहे.

पाहा संभाजीराजे छत्रपती यांनी नेमक्या कोणत्या घोषणा केल्या आहेत:

'महाराष्ट्राच्या जनतेनं छत्रपती घराण्यावर नितांत प्रेम केलं. यावेळी राज्यातील जनतेसाठीच्या कामामुळे मला खरं तर खासदारकी मिळाली होती. राज्यातील जनतेसाठी केलेलं काम लक्षात घेऊन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्षात आल्यानंतर, पंतप्रधान मोदींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मला बोलावून विनंती केली की, आपण राष्ट्रपती नियुक्त खासदार व्हावं. राष्ट्रपती नियुक्त खासदाराची गरीमा वेगळी असते. म्हणून 2016 साली मी ते पद स्वीकारलं. म्हणून प्रथमत: राष्ट्रपतींचं, पंतप्रधान मोदी आणि माजी मुख्यमंत्री फडणवीस यांचं मनापासून आभार व्यक्त करतो.'

'दोन निर्णय मी घेतले आहेत, पहिला निर्णय हा राज्यसभेच्या संदर्भातील आहे. राज्यसभेतील समीकरण पाहिलं असेल तर येत्या जुलैमध्ये सहा जागा रिक्त होणार आहेत. पूर्वीच समीकरण कसं होतं तर 3 जागा भाजप, 1 जागा राष्ट्रवादी, 1 जागा शिवसेना आणि 1 जागा काँग्रेस हे असं सहा जागांचं समीकरण आहे.'

'आता विधानसभा झाल्यानंतर नवं समीकरण काय? तर दोन जागा भाजपला, तर प्रत्येकी एक जागा राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेला जाणार आहे. सहावी सीट याचं संख्याबळ कमी असल्यामुळे कुठल्याही एका पक्षाला मिळू शकत नाही. राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी जे 42 चं कोशन्ट लागतंय त्या 42 च्या कोशंटसाठी तुम्हाला खासदारकी मिळवायची असेल तर महाविकास आघाडीकडे 27 मतं आहेत आणि भाजपकडे 22 मतं आहेत. तर माझा क्लेम इथे असा राहणार आहे की, यावर्षीची राज्यसभेची निवडणूक मी निश्चित लढवणार आहे. पण ही निवडणूक लढवताना मी कोणत्या पक्षात जाणार हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. तर याप्रसंगी मी सांगू इच्छितो की, यावर्षीची ही निवडणूक मी अपक्ष म्हणून लढवणार आहे.'

'यावर्षीची राज्यसभेची निवडणूक मी अपक्ष म्हणून लढवणार आहे. सर्वपक्षीय नेत्यांना विनंती आहे की, माझी छत्रपती शिव-शाहूचा वंशज म्हणून माझी राज्यसभेवर निवड करावी.'

'माझा दुसरा निर्णय.. मी शिव-शाहूंचा वंशज आहे म्हणूनच मला एवढं प्रेम दिलं आहे. तेव्हापासूनच अनेकांच्या डोक्यात होतं की, मी एखादा पक्ष काढावा. अनेक संघटनेतील लोकं मला नेहमी पाठिंबा देतात. ही ताकद आहे छत्रपती घराण्याची. मला नेहमी वाटायचं की, ही ताकद आपण संघटीत का करु शकत नाही? किती वेळ नुसतं समाजासाठी पळायचं. आपण राजतीय आवाज उठवायचा की नाही?'

sambhajiraje big announcement independent elections will be fought in rajya sabha elections kolhapur
Maratha Reservation : ...तर मग मला मुख्यमंत्री करा - खासदार संभाजीराजे

'मला चांगले-वाईट अनुभव बरेच आले. पण एवढं निश्चित आहे की, जनतेला एका छताखाली कसं आणता येईल हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. म्हणून मी निर्णय घेतला आहे की, जो माझा दुसरा महत्त्वाचा निर्णय आहे जो राजकीय आहे. तो म्हणजे या सगळ्यांना संघटीत करण्यासाठी समाजाला वेगळी दिशा देण्यासाठी जिथे अन्याय होतो तिथे लढा देण्यासाठी मी एक संघटना स्थापित करणार आहोत आणि त्या संघटनेचं नाव आहे स्वराज्य.'

'स्वराज्य या संघटनेचा प्रसार होण्यासाठी मी लवकरच ज्याप्रमाणे शिव-शाहू दौरा केला होता त्याप्रमाणेच महाराष्ट्राचा दौरा करणार आहे.'

'जेव्हा माझा सामाजिक प्रवास सुरु झाला तेव्हा अनेकांची इच्छा होती की, राजे तिसरी आघाडी निर्माण व्हायला पाहिजे, तुम्ही वेगळा पक्ष स्थापन केला पाहिजे. त्यांचा मी आदर करतो.'

'उद्या स्वराज्य ही संघटना राजकीय पक्षात रूपांतर झाल तर वावग समजू नका. मी सर्व 29 अपक्ष आमदारांना भेटणार आहे आणि त्यांना विनंती करणार आहे की मला पाठिंबा द्या. माझा 6 वर्षांचा कार्यकाळ पाहिला तर असं समजतं की, मी राज्यसभेसाठी पोषक उमेदवार आहे.' असा दावाच संभाजीराजे यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.