Maharashtra political Crisis : ‘तुम्ही पक्षपाती आहात’, संजय राऊत भडकले
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : सुप्रीम कोर्टातील निकाल येण्याआधीच शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या टीका केली. तुम्ही पक्षपाती आहात, असा गंभीर आरोप राऊतांनी केला.
ADVERTISEMENT

Sanjay Raut On supreme court Verdict, Maharashtra Political crisis : सर्वोच्च न्यायालयाचे पाच सदस्यीय घटनापीठ महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर महत्त्वपूर्ण निकाल देणार आहे. या निकालाच्या आधी खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना भूमिका मांडली. यावेळी त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला.
मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “विधासभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसले होते उपाध्यक्ष असलेले आमचे नरहरी झिरवळ. त्यांनी 16 आमदारांच्या बाबतीत जो निर्णय दिला, तो कायदा, घटना हे पाहून त्यांनी निर्णय दिला. ते प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं.”
तुमची नियुक्तीच घटनाबाह्य -संजय राऊत
संजय राऊत पुढे असं म्हणाले की, “आताचे विधानसभा अध्यक्ष सांगताहेत की, निर्णय माझ्याकडेच येईल. म्हणजे कुणाकडे येईल. तुम्ही पक्षपाती आहात. तुम्ही घटनाबाह्य सरकार बनवलं आहे. तुमची नियुक्तीच घटनाबाह्य आहे विधानसभा अध्यक्षपदी. त्यामुळे निर्णय तुमच्याकडे येऊ शकत नाही. तो निर्णय तेव्हाचे अध्यक्ष, जे त्या खुर्चीवर बसलेले होते. कायद्याने आणि घटनेने नरहरी झिरवळ यांच्याकडे तो निर्णय यायला पाहिजे, असं मला म्हणायचं आहे”, असं सांगत संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निवडीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
हेही वाचा >> Ulhas Bapat : Eknath Shinde की Uddhav Thackeray, सुप्रीम कोर्टात कोण जिंकणार?
आमचा न्यायावर विश्वास, निकालाआधी राऊत काय म्हणाले?
“सर्वोच्च न्यायालयाकडून मला काही अपेक्षा नाही. मला न्यायाची अपेक्षा आहे. आम्ही न्याय विकत घेणारी माणसं नाही आहोत. जे न्याय विकत घेऊ शकतात, ते सत्तेवर आहेत. निर्णय आमच्या बाजूने लागेल वगैरे याबद्दल त्यांना जी खात्री वाटतेय, ही आम्ही न्याय विकत घेऊ शकतो हा मस्तवालपणा आहे. आम्ही तसं म्हणणार नाही. आमचा न्यायावर विश्वास आहे. घटनापीठाने सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली प्रदीर्घ काळ ही सुनावणी घेतली. दोन्ही भूमिका ऐकलेल्या आहेत. मला असं वाटतं की, आज ते निर्णय देतील आणि निर्णयाच्या प्रतिक्षेत आहेत”, असं मत संजय राऊत यांनी निकालाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केलं.
