आव्हाडांवर ‘बाण’, बावनकुळेंना सुनावलं; ‘औरंगजेबजी’वरून संजय राऊत भडकले

मुंबई तक

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबाचा उल्लेख ‘औरंगजेबजी’ केला. तर ‘औरंगजेब क्रूर नव्हता’, असं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलाय. यावरूनच खासदार संजय राऊतांनी आव्हाडांचा चिमटे काढलेत, तर बावनकुळेंना खडेबोल सुनावले आहेत. संजय राऊत रोखठोकमध्ये म्हणतात, “राज्यपालांनी शिवरायांचा अपमान केला. संभाजीराजांचा अपमान अजित पवारांनी केला असा भाजपचा दावा. ‘संभाजीराजे हे स्वराज्य रक्षकच, धर्मवीर नाहीत’ या पवारांच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबाचा उल्लेख ‘औरंगजेबजी’ केला. तर ‘औरंगजेब क्रूर नव्हता’, असं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलाय. यावरूनच खासदार संजय राऊतांनी आव्हाडांचा चिमटे काढलेत, तर बावनकुळेंना खडेबोल सुनावले आहेत.

संजय राऊत रोखठोकमध्ये म्हणतात, “राज्यपालांनी शिवरायांचा अपमान केला. संभाजीराजांचा अपमान अजित पवारांनी केला असा भाजपचा दावा. ‘संभाजीराजे हे स्वराज्य रक्षकच, धर्मवीर नाहीत’ या पवारांच्या विधानावर आता भाजपने वाद केला; पण संभाजीराजे धर्मवीर म्हणून मान्य पावले ते औरंगजेबाने त्यांच्यावर केलेल्या निर्घृण अत्याचारामुळे. त्या औरंगजेबाचा अत्यंत आदरपूर्वक ‘मा. औरंगजेबजी’ असा उल्लेख काल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.”

“याच ‘औरंगजेबजी’ यांनी धर्मवीर संभाजीराजांना अटक केली, त्यांची धिंड काढली, त्यांना विदूषकी पोशाख घातला, त्यांची निर्घृण हत्या केली. त्यांचे डोळेही फोडले, पण संभाजीराजेंनी धर्माभिमान व स्वाभिमान सोडला नाही. हे सर्व ज्या क्रूरकर्मा औरंगजेबामुळे घडले ते ‘औरंगजेबजी’ काय साधी असामी होती? असेच भाजपच्या बावनकुळेंना म्हणायचे आहे”, अशा शब्दात राऊतांनी निशाणा साधलाय.

Raut: ‘शिंदे सरकार फेब्रुवारीही पाहणार नाही, राऊतांनी कारणच सांगितलं!

हे वाचलं का?

    follow whatsapp