महामोर्चा: ‘मुका मोर्चा म्हणणारे आता..’, फडणवीस जेव्हा राऊतांना पडतात भारी!

मुंबई तक

Devendra Fadnavis criticism Sanjay Raut: नागपूर: महाविकास आघाडीने जो हल्लाबोल मोर्चा काढला होता. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नॅनो मोर्चा म्हणत विरोधकांवर बोचरी टीका केली होती. ज्याला उत्तर देताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. पण हा व्हिडीओ हल्लाबोल मोर्चाचा नसून तो मराठा समाजाचा असल्याचा दावा अनेक जण करत आहेत. त्याचवरुन […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Devendra Fadnavis criticism Sanjay Raut: नागपूर: महाविकास आघाडीने जो हल्लाबोल मोर्चा काढला होता. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नॅनो मोर्चा म्हणत विरोधकांवर बोचरी टीका केली होती. ज्याला उत्तर देताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. पण हा व्हिडीओ हल्लाबोल मोर्चाचा नसून तो मराठा समाजाचा असल्याचा दावा अनेक जण करत आहेत. त्याचवरुन आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना संजय राऊतांना खडे बोल सुनावले आहेत. ते नागपूरमध्ये बोलत होते.

‘एक तर मराठा मोर्चा कोणत्या पक्षाचा नव्हता तो मराठा समाजाचा होता. त्या मोर्चाला हीच मंडळी होती. ज्यांनी मूक मोर्चाचं मुका मोर्चा म्हणून अतिशय बीभत्स अशा प्रकारे त्यावर आपलं मत व्यक्त केलं, आपल्या पेपरमध्ये छापलं आणि आता पुन्हा तेच लोकं त्याचा व्हिडीओ ट्वीट करतात. मग नंतर मुजोरी करतात की, एमव्हीएने तो मोर्चा काढला होता.’ असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी त्या व्हिडीओवरुन राऊतांना बरंच काही सुनावलं आहे.

‘महामोर्चा’ ऐवजी मराठा मोर्चाचा व्हिडीओ? संजय राऊत ट्रोल; संभाजीराजेंनीही केली कानउघडणी

पाहा देवेंद्र फडवणीस नेमकं काय म्हणाले:

हे वाचलं का?

    follow whatsapp