अदाणींची पाठराखण करताच गदारोळ, शरद पवारांनी बोलावली तातडीची पत्रकार परिषद; म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

sharad pawar has said that he is not directly opposed to jpc in Adani case
sharad pawar has said that he is not directly opposed to jpc in Adani case
social share
google news

Sharad Pawar on Gautam Adani: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उद्योजक गौतम अदाणी (Gautam Adani) यांच्या समूहाच्या एनडीटीव्ही वृत्तवाहिनीला काल (7 एप्रिल) एक मुलाखत दिली होती. ज्यामध्ये त्यांनी जेपीसी समितीला विरोध केला होता. ज्यानंतर राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली होती. शरद पवार यांच्या भूमिकेबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. ज्यामुळे राजकीय वर्तुळात काहीशी संभ्रावस्था तयार झालेली. मात्र, ही गोष्ट लक्षात येताच आज (8 एप्रिल) सकाळीच आपल्या मुंबईतील निवासस्थान शरद पवार यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलावली. (sharad pawar has said that he is not directly opposed to jpc in Adani case. but inquiry committee of supreme court is more important)

या पत्रकार परिषदेत आपण जेपीसीला का विरोध केला याचे स्पष्टीकरण शरद पवार यांनी यावेळी दिलं आहे. विरोधक हे एकत्रच आहेत. पण काही मुद्द्यांवर मतभिन्नता असू शकते असंही शरद पवार यावेळी म्हणाले. एकीकडे काँग्रेस जेपीसीच्या मागणीवर कायम आहेत. तर दुसरीकडे शरद पवार मात्र, अद्यापही जेपीसीची जरुरी नाही असंच म्हणत आहेत. पाहा शरद पवार पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले.

जेपीसीला माझा विरोध नाही, पण…

‘जेपीसी म्हणजे काय? ज्वॉइंट पार्लमेंट्री कमिटी. लोकसभा आणि राज्यसभा हे दोन सभागृह आहेत. या दोन्ही सभागृहातील सदस्यांची ही समिती आहे. साधारणत: जेपीसीची रचना कशी होते की, ज्या पक्षाच्या सभासदांची संख्या अधिक आहे त्यांना अधिक जागा मिळतात. उदाहरणार्थ 21 लोकांची जेपीसी असेल तर त्यात 15 लोक हे सत्ताधारी पक्षाचे म्हणजे भाजपचे असतील. तर सहा ते सात लोक विरोधी पक्षाचे असतील. ज्या समितीत विरोधी पक्षाचे नेते इतके कमी आणि सत्ताधारी पक्षाची संख्या इतकी अधिक याचा अर्थ ज्याची चौकशी नीट करावी अशी आपली अपेक्षा त्या संबंधीची शंका व्यक्त करण्याला संधी आहे.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अधिक वाचा- शरद पवारांचा थेट राहुल गांधींवर हल्ला, अदाणींवरील आरोपांवरून पिळले कान

‘त्याऐवजी सुप्रीम कोर्टाने एक समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. ज्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती आणि इतर काही लोक आहेत. सुप्रीम कोर्टाने आणखी एक गोष्ट केली. किती दिवसात या समितीने अहवाल द्यायचा.. या संबंधी देखील सूचना केली. माझं मत असं आहे की, मी जेपीसीला सरसकट विरोध करत नाही. यापूर्वी जेपीसी होती. काही जेपीसींचा मी स्वत: चेअरमन होतो. पण जेपीसीत बहुमताच्या संख्येवर त्याठिकाणी पारदर्शक निर्णय होईल याची शाश्वती नाही. म्हणून मी जेपीसी ऐवजी सर्वोच्च न्यायालयाची समिती अधिक योग्य असल्याचं सांगितलं. 18-19 पक्ष एकत्र आले ते चांगलं आहे. पण त्या पक्षांना जेपीसीमध्ये संधी मिळणार नाही. ठराविक पक्षांनाच संधी मिळेल.’ असं म्हणत शरद पवार हे आपल्या मुलाखतीतील मुद्द्यावरच ठाम राहिले.

‘हिंडेनबर्ग कोण हे मला माहित नाही’

‘आता हिंडेनबर्ग कोण हे मला माहित नाही. ही कंपनी परदेशातील.. ती या देशाच्या परिस्थिती संबंधी काही भूमिका घेते. त्यावर आपण किती लक्ष केंद्रीत करायचं याचा आपण विचार केला पाहिजे.त्यापेक्षा सुप्रीम कोर्टाची समिती ही अधिक प्रभावी ठरेल असं मला वाटतं. कोणतीही बाहेरची संघटना ही आम्हाला सांगणार त्यापेक्षा या देशाच्या सुप्रीम कोर्टाने आम्हाला सांगितलं तर ते लोकांच्या विश्वासाला अधिक पात्र ठरेल.20 हजार कोटी वैगरे याची आकडेवारी माझ्याकडे नाही. त्याची माहिती घेईन आणि मी बोलेल. एखाद्या आरोप करताना त्याची माहिती माझ्याकडे असली पाहिजे. ती माहिती आता तरी माझ्याकडे नाही.’ असं म्हणत पवार हे सुप्रीम कोर्टाच्या समितीकडून चौकशी व्हावी हा मुद्दा कायम ठेवला.

ADVERTISEMENT

अधिक वाचा- शरद पवारांची ‘ती’ मुलाखत, अजित पवार खरंच नॉट रिचेबल?; पुन्हा राजकीय भूकंपाची चर्चा

अधिक वाचा- Adani समूहाला मिळालेल्या ‘धारावी’ प्रोजेक्टवर शरद पवार स्पष्ट बोलले…

राहुल गांधींसमोर सावरकरांच्या विषयी चर्चा झाली

आम्ही खरगेंच्या घरी एक बैठक घेतली होती. त्या बैठकीत सावरकरांचा विषय निघाला. त्या बैठकीत सोनिया गांधी तसेच ज्यांनी सावरकरांवर आरोप केले ते राहुल गांधी देखील होते. त्यांच्या समोर मी सावरकरांच्या विषयीची भूमिका मांडली. तिथे चर्चा झाली, पण नंतर त्यानंतर विषय संपला. त्यामध्ये चर्चा होत असते.. मतभिन्नताही असू शकते.. मतं मांडण्याची संधीही असते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT