Madha Lok Sabha Election 2024 : ''मोहिते पाटलांना सत्तेचा माज, मी आमदार झालो म्हणून...'', राम सातपुतेंची बोचरी टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Ram satpute criticize dhairyasheel mohite patil madha lok sabha election 2024 praniti shinde sushil kumar shinde
देवेंद्रजींनी ही सांगितलं यांना आमदारकीही नव्हती, देवेंद्रजींनी यांना आमदारकी दिली.
social share
google news

Ram satpute criticize Dhairyasheel Mohite Patil : अभिजीत करंडे, सोलापूर :  सोलापूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार राम सातपूते यांनी माढ्याच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांवर जोरदार हल्लाबोल करत गंभीर टीका केली आहे. अकलुजमध्ये त्यांनी (मोहिते पाटलांनी) प्लॉटींगचे धंदे केले, व्यापाऱ्यांना धमक्या दिल्या, हफ्ते वसलूी केली. तुम्ही तिथल्या व्यापाऱ्यांना जाऊन विचारा. मी जर बोलायला लागलो तर यांची पळता भुई थोडी होईल, असा शब्दात राम सातपुते (Ram satpute) यांनी मोहिते पाटलांवर (Dhairyasheel Mohite Patil) जोरदार टीका केली.  (Ram satpute criticize dhairyasheel mohite patil madha lok sabha election 2024 praniti shinde sushil kumar shinde) 

ADVERTISEMENT

बीडचं पार्सल परत पाठवू अशी टीका धैर्यशील मोहिते पाटलांनी राम सातपुतेंवर केली होती. या टीकेवर उत्तर देताना सातपुते म्हणाले की, ''मोहिते पाटलांना सत्तेचा माज आहे. आम्ही मोठ्या घरात जन्माला आलो असा त्यांना अॅटीट्युड आहे. मुळात मोहिते पाटलांच राजकारण संपलं होतं. कारण देवेंद्रजींनी ही सांगितलं यांना आमदारकीही नव्हती, देवेंद्रजींनी यांना आमदारकी दिली. मी त्या ठिकाणी आमदार झालो. मी तिकडे आमदार झालो म्हणून त्यांना आमदारकी मिळाली होती'', असे सातपुते यांनी यावेळी सांगितले. 

हे ही वाचा : Nashik Lok Sabha : हेमंत गोडसेंचा पत्ता कट?; शांतिगिरी महाराजांनी भरला अर्ज

''तुम्हाला इतका सत्तेचा माज, उन्माद, इतका अहंकारपणा तुम्ही पब्लिकली एका मागासवर्गीय सामान्य परिसरातून आलेल्या उमेदवाराला धमकी देता. सत्तेचा माज आहे, म्हणून हे संपले आहेत. जिल्ह्यावर राज्य करणारे मोहिते पाटील आता अकलुज शहरापुरते उरले आहेत'', असा 
टोला देखील सातपुते यांनी मोहिते पाटलांना लगावला. 

हे वाचलं का?

''मोहिते पाटलांनी माळशिरसमध्ये एमआयडीसी इतक्या वर्ष का उभारली नाही? कारण त्यांच्या कारखान्यामध्ये 6 हजार रूपये पगाराने तिथला कामगार काम करतो'', म्हणून तिकडे एमआयडीसी उभारली नसल्याचा आरोप सातपुते यांनी मोहिते पाटलांवर केला. ''यांनी (मोहिते पाटील) 
वॉटरपार्कला पाणी नेलं यातून ते करोडो रूपये  कमवतात. पण शेतकऱ्यांना पाणी देण्याचा यांनी कधीही प्रयत्न केला नाही. 22 गाव दुष्काळी आहेत त्यांना पाणी रणजितसिंह निंबाळकर आणि भाजपने दिल्याचे'' सातपूते यांनी सांगितले. तसेच फलटण-पंढरपूर रेल्वे मोहिते पाटलांनी का नाही आणली? असा सवाल करत  मोहिते पाटलांच्या सत्तेच्या माजाला उत्तर माढ्याची जनता देईल. दोन लाख मतांनी रणजितसिंह मोहिते पाटील निवडून येतील, असा विश्वास सातपुते यांनी व्यक्त केला. 

हे ही वाचा : शरद पवारांच्या उमेदवारांवरच अटकेची तलवार, प्रकरण काय?

मोहिते पाटलांनी माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागाचा कधीही विकास केला नाही. कारण तिकडे त्यांना विरोधात मतदान होते. अकलूज सोडून त्यांनी कुठेच विकास केला नाही. अकलूजमध्ये त्यांचे प्लॉटींगचे धंदे, त्या ठिकाणी धमक्या देणे, हफ्ते घेणे, तुम्ही तिथल्या व्यापाऱ्यांना जाऊन विचारा, असा आरोप सातपुते यांनी केला. 

ADVERTISEMENT

''सोलापूरला शिंदेंनीच देशोधडीला लावलं''

सोलापूरचे रस्ते सुशीलकुमार शिंदेंनी कधीच चांगले केले नाही, ते मुंबईला, महाबळेश्वरला राहायचे. त्यामुळे त्यांना सोलापूरचे कधी प्रश्न पडले नाही. सोलापूरला शिंदेंनीच देशोधडीला लावला. हे आमदार, खासदार होते, माजी मुख्यमंत्री राहीले आहेत. पण या सोलापूरला काही देऊ शकले नाही आहेत, अशी टीका सातपुते यांनी सुशील कुमार शिंदेंवर केली. 

ADVERTISEMENT

भाजपकडून संविधान बदलले जाईल, असा आरोप होतोय, यावर बोलताना सातपुते म्हणाले, पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनी स्पष्ट सांगितलंय 400 पार आम्ही गेलो तरी संविधानाला धक्का लागणार नाही. आणि कुणाच्या बापात हिंमत नाही आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेले संविधान बदलायची. त्यामुळे संविधान बदलायची गोष्ट येत नाही, असे सातपुते यांनी सांगितले. 
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT