काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक शशी थरूर लढवू शकतात, सोनिया गांधी म्हणाल्या Its Your Call
काँग्रेस नेते शशी थरूर यांनी सोमवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या दरम्यान त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत सोनिया गांधींना प्रश्न विचारला. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक मला लढवायची असेल तर मी लढवू का? असा प्रश्नही शशी थरूर यांनी सोनिया गांधी यांना विचारल्याचं कळतंय. यावर सोनिया गांधी Its Your Call असं म्हणाल्या आहेत. त्यामुळे आता अध्यक्षपदाची […]
ADVERTISEMENT

काँग्रेस नेते शशी थरूर यांनी सोमवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या दरम्यान त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत सोनिया गांधींना प्रश्न विचारला. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक मला लढवायची असेल तर मी लढवू का? असा प्रश्नही शशी थरूर यांनी सोनिया गांधी यांना विचारल्याचं कळतंय. यावर सोनिया गांधी Its Your Call असं म्हणाल्या आहेत. त्यामुळे आता अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा चेंडू थरूर यांच्या कोर्टात आहे.
Congress President Election : शशी थरूर यांना अध्यक्षपदाची निवडणूक लढवायची आहे?
शशी थरूर लढवणार काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक?
समोर आलेल्या माहितीनुसार शशी थरूर हे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतात. मात्र ही निवडणूक लढवायची आहे की नाही हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय असणार आहे. मात्र याबाबत तुम्ही काय तो निर्णय घ्या असं सोनिया गांधी यांनी शशी थरूर यांना सांगितल्याचं कळतंय. आज तकने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
सोनिया गांधी यांचं काय म्हणणं आहे?
सोनिया गांधी यांची आणि शशी थरूर यांच्यात जी चर्चा झाली त्यात अध्यक्षपदाचा प्रश्न जेव्हा शशी थरूर यांनी विचारला तेव्हा तो निर्णय तुमचा तुम्ही घ्या असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. याचाच अर्थ आता काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी कुणीही स्वतंत्र आहे. गांधी परिवाराने यासाठी कोणताही उमेदवार दिलेला नाही. आज तकच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शशी थरूर हे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतात.