Sheetal Mhatre : व्हायरल व्हिडीओ प्रकरणात तीन जण ताब्यात; एक काँग्रेसशी संबंधित?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Sheetal Mhatre Latest News: शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांच्याशी संबंधित व्हायरल व्हिडीओ प्रकरणी ३ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यातील २ जणांना दहिसर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर एकाला शिवसैनिकांनी मारहाण करुन समतानगर पोलिसांच्या ताब्यात दिलं. हा इसम काँग्रेसशी (Congress) संबंधित असल्याचं सांगण्यात येत आहे. या तिघांचीही सध्या पोलीस कसुन चौकशी करत आहेत. मात्र या प्रकरणात आता राजकीय कनेक्शनही समोर आल्याचं बोललं जात आहे. (Sheetal Mhatre: Three arrested in viral video case)

शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांच्याशी संबंधित एक व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला. मात्र हा व्हिडीओ मॉर्फ (मूळ व्हिडीओशी छेडछाड) करुन व्हायरल करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसंच ठाकरे गटाच्या आणि युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनीच हा व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोपही शीतल म्हात्रेंनी केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचे पुत्र राज सुर्वे यांनी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

याच तक्रारीवरुन दहिसर पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. मानस कुवर (वय २६) आणि अशोक मिश्रा (वय ४५) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. दहिसर पोलिसांनी याआधी आमदार पुत्र राज सुर्वे यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ३५४, ५०९, ५००, ३४ आणि ६७ अन्वये गुन्हा दाखल केला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Sheetal Mhatre: व्हायरल व्हिडीओवरून सुषमा अंधारेंनी शीतल म्हात्रेंनाच सुनावलं

तिसरा काँग्रेसशी संबंधित?

दरम्यान, याच प्रकरणात कांदिवली पूर्व येथील एका व्यक्तीची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी धुलाई करुन समता नगर पोलिसांच्या स्वाधीन केले होते. राजेश गुप्ता असे ताब्यात दिलेल्या व्यक्तीचं नाव असून तो काँग्रेसचा जिल्हा सरचिटणीस असल्याची चर्चा आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.

ADVERTISEMENT

Sheetal Mhatre: ‘आम्ही त्यांना फोडून काढतो’, व्हिडीओवरून रुपाली पाटलांचा चढला पारा

ADVERTISEMENT

प्रकरण नेमकं काय?

भाजप-शिवसेना युतीच्या वतीने मुंबईत आशीर्वाद यात्रा आयोजित करण्यात आलेली आहे. सहा लोकसभा मतदारसंघात ही यात्रा काढली जाणार असून, शनिवारी शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा यात्रेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ मॉर्फिंग करून आणि अश्लील संदेश लिहून व्हायरल करण्यात आल्याचा आरोप शीतल म्हात्रेंनी केला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT