मुंबई Tak बैठक: शिंदे की फडणवीस.. 2024 ला कोण असणार मुख्यमंत्री?, एकनाथ शिंदे म्हणतात…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Chief Minister Eknath Shinde has commented on the post of Chief Minister
Chief Minister Eknath Shinde has commented on the post of Chief Minister
social share
google news

CM Eknath Shinde in Mumbai Tak Baithak: मुंबई: राज्यात अतिशय नाट्यमयरित्या शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आलं. भाजपच्या (BJP) केंद्रीय नेतृत्वाने अगदी शेवटच्या क्षणी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्या पारड्यात वजन टाकत नेहमीप्रमाणे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. असं असताना आता आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुका या कोणाच्या नेतृत्वात लढवल्या जाणार किंवा या निवडणुकींसाठी भाजप नेमका कोणाचा चेहरा पुढे करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याचबाबत स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई Tak बैठक या विशेष कार्यक्रमात महत्त्वाचं विधान केलं आहे. (shinde or fadnavis who will be the face of chief ministership in 2024 see what cm eknath shinde answered)

खरं तर मुख्यमंत्री पदावरूनच 2019 मध्ये सारं राजकारण घडलं. असं असतानाच भाजपने आपली सत्ता स्थापन करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देऊ केलं. खरं तर गेल्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री पद हा कळीचा मुद्दा ठरला. पण आता 2024 च्या निवडणुकीत नेमकं कोणाच्या नेतृत्वात निवडणुका लढवल्या जाणार याविषयी एकनाथ शिंदे काय म्हणाले हे आपण जाणून घेऊया.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुंबई Tak बैठकमध्येच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचबाबत सांगितलं की, ‘हे सरकार एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढणार तेच आमचा चेहरा असतील आणि त्यांच्या नेतृत्वातच आम्ही निवडणूक लढू.’

अधिक वाचा- मुंबई Tak बैठक: अजित पवार नॉट रिचेबल असताना कुठे होते?, फडणवीसांनी खरं काय ते सांगूनच टाकलं!

2024 साठी सेना-भाजपमधील कोण असणार मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?

हाच प्रश्न जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारण्यात आला तेव्हा शिंदे म्हणाले की, ‘2024 च्या निवडणुका शिवसेना-भाजप एकत्रितपणे लढवणार आणि त्या जिंकणार. चेहऱ्याचं काय.. शिवसेना-भाजपचे जे कार्यकर्ते जे निवडणुका जिंकून देत असतात. निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्ता हा फेस असतो. त्यांच्या ताकदीवरच निवडणुका जिंकत असतो.’

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

मात्र, असं असताना काही दिवसांपूर्वी दुसरीकडे चंद्रकांत बावनकुळे म्हणाले होते की, शिवसेनेला 50 जागा देऊ. यावरही मुख्यमंत्री शिंदे यांनी सविस्तर उत्तर दिलं.

अधिक वाचा- शरद पवारांच्या मनात काय? जयंत पाटलांनी सांगितली 2019 ची स्टोरी; म्हणाले,…

‘निवडणुका दूर आहेत. ज्या निवडणुका येत आहेत त्या आम्ही एकत्रितपणे लढवत आहोत. जसा पुढील निवडणुका येतील तेव्हा सीट शेअरिंगाचा जो विषय आहे.. तो आम्ही आहोत.. देवेंद्रजी आहोत… दिल्लीत निर्णय घेणारे लोक आहेत. योग्य तो निर्णय होईल.’ असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते.

मागील काही वर्षातील भाजपचं राजकारण पाहता आता आगामी काळात नेमकं काय राजकारण घडणार याकडेच अवघ्या महाराष्ट्राचे डोळे लागून राहिले आहेत. मात्र, एक गोष्ट नक्की आहे की, मुख्यमंत्री शिंदे किंवा शिवसेनेच्या आमदारांना फार सावधपणे आपली पुढची पावलं उचलावी लागणार आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT