शिव-भीमशक्तीची युती: '...म्हणून आम्ही एकत्र आलोय', ठाकरेंचं मोठं विधान

Shiv Sena-VBA alliance: शिवशक्ती-भीमशक्तीच्या युती आज अखेर जाहीर झाली आहे. यावेळी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करत आपण युती का केली याबाबत भाष्य केलं.
शिवसेना-वंचित बहुजन आघाडीची युती जाहीर
शिवसेना-वंचित बहुजन आघाडीची युती जाहीरFacebook

Shivshakti and Bhimshakti alliance announced: मुंबई: स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीचं औचित्य साधत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shiv sena) वंचित बहुजन आघाडीसह (Vanchit Bahujan Aghadi) युती (Alliance) केल्याची घोषणा केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar ) यांनी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली. यासोबतच दोघांनीही भाजपवर (BJP) जोरदार हल्ला चढवला. भाजप देशाला हुकूमशाहीकडे घेऊन चालंल आहे आणि त्याविरोधात आघात करण्यासाठी मोडून-तोडून टाकण्यासाठी शिवशक्ती आणि भीमशक्ती (Shivshakti and Bhimshakti) पुन्हा एकत्र आली आहे. असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं आहे. (shiv sena and vanchit bahujan aghadi announce alliance uddhav thackeray and prakash ambedkar criticize bjp)

जनतेला भ्रमात ठेवायचं, नको त्या वादात अडकवायंच अन्...: उद्धव ठाकरे

'एका गोष्टीचं समाधान आहे की, ज्या एका स्वप्नाची महाराष्ट्रातील जनता आतुरतेने वाट पाहत होती. यापूर्वी देखील असा प्रयत्न झाला होता.. नाही असा नाही. पण प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र एका व्यासपीठावर पुढची वाटचाल एकत्र करण्यासाठी या वास्तूमध्ये आलो आहोत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंबेडकर आणि ठाकरे या नावाला एक इतिहास आहे पार्श्वभूमी आहे.'

शिवसेना-वंचित बहुजन आघाडीची युती जाहीर
Shiv sena VBA Alliance : उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर आज करणार घोषणा

'माझे आजोबा आणि प्रकाशजींचे आजोबा हे सहकारी. एकमेकांचे स्नेही होते. दोघांनी त्यावेळेला समाजातील वाईट रुढी पंरपरा यावर प्रहार केले आघात केले. आता राजकारण ज्या वाईट चाली, पंरपरा चालल्या आहेत त्याच्यावर आघात करून त्या मोडून तोडून टाकण्यासाठी या दोन्ही पिढ्यांचे वारसदार आणि त्यांच्यासोबतचे आमच्या आजोबांनी-वडिलांनी दिलेले जीवाला-जीव देणारे जे काही सहकारी आहेत ते एकत्र येऊन.. देश प्रथम. हा शब्द महत्त्वाचा आहे.'

'कारण एक भ्रम पसरवला जातो आणि एक हुकूमशाहीकडे वाटचाल ही अशीच होते. जनतेला भ्रमात ठेवायचं, नको त्या वादात अडकवून ठेवायचं आणि आपलं इप्सित जे आहे ते साध्य करायंचं. त्याच एका वैचारिक प्रदूषणातून देशाला मोकळा श्वास घेण्यासाठी घटनेचं महत्त्व, संविधान हे त्याचं महत्त्व आणि पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी म्हणून आम्ही दोघं एकत्रित येत आहोत. पुढे राजकीय वाटचाल कशी असेल या गोष्टीचा परिस्थितीनुसार विचार केला जाईल.'

'महाराष्ट्रातील तळागळातील जनतेपर्यंत पोहचविण्याची गरज आहे. निवडणूक आल्या की, गरीबांचा उदोउदो करायचा.. गरीबांनी मतदान केल्यानंतर यांची उड्डाणं चालू. हे आता थांबविण्याची गरज आहे. म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत.'

शिवसेना-वंचित बहुजन आघाडीची युती जाहीर
उद्धव ठाकरेंना वंचित बहुजन आघडीकडून ऑफर! काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र का आली?

देशाची राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस अधोगतीकडे जाताना दिसत आहे. लोकशाही स्वातंत्र्याची गळचेपी करत देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे. हुकूमशाहीकडे सुरु झालेली वाटचाल थांबविण्यासाठी राजकीय पाऊल उचलण्याची आवश्यकता प्रकर्षाने जाणवत आहे.
जनसामान्यांच्या जीवनमरणाच्या प्रश्नांना बाजूला सारून अवास्तव विषयांना प्राधान्य दिले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेतील शेवटच्या भाषणात (25 नोव्हेंबर 1949 रोजी) देशाला उद्देशून इशारा दिला होता की, देशामध्ये सामान्यांचे प्रश्न सोडून इतर विषयांत महत्त्व दिले तर देशाच्या स्वातंत्र्याला पुन्हा धोका निर्माण होऊ शकतो.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही नेहमीच देश आणि लोकहिताला प्राधान्य दिले. लोकशाहीस प्राधान्य दिले नाही तर देशात अराजक निर्माण होईल ही, त्यांची भूमिका डॉ. आंबेडकरांच्या परखड विचारांशीच मिळणारी आहे. महात्मा फुले, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्म ही आवश्यक बाब असल्याचे नमूद केले आहे. परंतु या तिघांनीही राष्ट्राला प्राधान्य दिलेले आहे.
लोकशाही टिकली तरच देश टिकतो. असे मत प्रबोधनकार ठाकरे यांनीसुद्धा मांडले आहे. म्हणून आम्ही एकत्र येऊन देशाचे स्थैर्य, नीतिमत्ता व राष्ट्रीय हिताचे राजकारण करण्यास कटिबद्ध आहोत.

असं संयुक्त निवेदन शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीकडून काढण्यात आलं असून दोन्ही पक्षाने नेमकी युती का केली याबाबत नेमकी बाजू मांडली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in