‘सदा सरवणकरांनी न्यायालयाची दिशाभूल केली’; न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेनेची प्रतिक्रिया
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला परवानगी दिली. २ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत शिवाजी पार्कचा वापर करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली. हा निकाल देताना न्यायालयाने शिंदे गटाची याचिका फेटाळून लावली. यावर शिवसेनेचे नेते अनिल परबांनी प्रतिक्रिया दिली. अनिल परब म्हणाले,”१९६६ पासून शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. एक नेता, एक व्यासपीठ, […]
ADVERTISEMENT

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला परवानगी दिली. २ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत शिवाजी पार्कचा वापर करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली. हा निकाल देताना न्यायालयाने शिंदे गटाची याचिका फेटाळून लावली. यावर शिवसेनेचे नेते अनिल परबांनी प्रतिक्रिया दिली.
अनिल परब म्हणाले,”१९६६ पासून शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. एक नेता, एक व्यासपीठ, एक झेंडा, एक जागा, असं समीकरण होतं. त्याला मुंबई उच्च न्यायालयाने मान्यता दिलीये. आमचा अर्ज आम्ही मुंबई महापालिकेकडे फार पूर्वी पाठवला होता. गेले काही दिवस त्यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय होत नव्हता. यासंबंधात वारंवार विचारणा करण्यात आली. आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिका दाखल झाल्यानंतर त्याच दिवशी आमचा अर्ज नाकारण्यात आला. हे काम इतकं पटकन केलं गेलं. त्यावर न्यायालयाने आपलं निरीक्षण नोंदवलं आहे”, असं म्हणत अनिल परबांनी मुंबई महापालिकेच्या निर्णयावर भाष्य केलं.
कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पोलिसांची आणि आमचीही -अनिल परब
“मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेसंदर्भात काही निरीक्षणं नोंदवली आहेत. न्यायालयाने पोलिसांनाही सूचना दिल्या आहेत. कारण कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याचं काम पोलिसांची जबाबदारी आहे आणि आमचीही जबाबदारी आहे. तसं आम्ही न्यायालयाला सांगितलं आहे”, असं अनिल परबांनी निकालानंतर म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंनी मैदान मारलं! शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच