शिवसेनेविरोधात बंड करणाऱ्या एकनाथ शिंदेंसह १६ जणांची आमदारकी जाणार?
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचं भवितव्य काय? एकनाथ शिंदेंचं पुढचं पाऊल काय असणार? भाजपच्या गोटात काय चाललंय, या आणि अशा प्रश्नांनी राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. आमदारांनी शिवसेनेला आव्हान दिल्यानंतर आता ‘मातोश्री’वर घडामोडी सुरूये. त्यातच आता शिवसेनेनं १६ बंडखोरांचं सदस्यत्व करण्याची शिफारस केली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात राजकीय वर्तुळ हादरलं. […]
ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचं भवितव्य काय? एकनाथ शिंदेंचं पुढचं पाऊल काय असणार? भाजपच्या गोटात काय चाललंय, या आणि अशा प्रश्नांनी राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. आमदारांनी शिवसेनेला आव्हान दिल्यानंतर आता ‘मातोश्री’वर घडामोडी सुरूये. त्यातच आता शिवसेनेनं १६ बंडखोरांचं सदस्यत्व करण्याची शिफारस केली आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात राजकीय वर्तुळ हादरलं. शिवसेना आमदारांचा एक मोठा गट घेऊन एकनाथ शिंदे सुरतला पोहोचले. त्यानंतर सर्व आमदारांना गुवाहाटीला देण्यात आलं. एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ अनेक आमदार गुवाहाटीत जाऊन पोहोचले आहेत.
उद्धव ठाकरेंच्या विभागप्रमुखांना सुचना, बैठकीत बंडखोर आमदारांचा शब्दही नाही काढला
अचानक झालेल्या या बंडानंतर आता शिवसेनेनं बंडखोर आमदारांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली आहे. शिवसेना सुरुवातीला १२ आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे केली होती. आता समोर आलेल्या माहितीनुसार शिवसेनेनं त्यात आणखी चार जणांची नावं जोडली आहे. त्यामुळे एकूण १६ जणांची आमदारकी रद्द करण्याची शिफारस शिवसेनेकडून करण्यात आली आहे.