शिवसेना कुणाची? दावा पक्का करण्यासाठी शिंदे-ठाकरेंना आयोगाकडून शेवटची संधी; 12 डिसेंबरला सुनावणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच निवडणूक चिन्ह गोठण्यात आलंय. 40 आमदारांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली बंड केलं आणि सत्ता स्थापन केली. पण, त्यानंतर शिंदे गटाने थेट शिवसेनेवरच दावा ठोकला. त्यामुळे ठाकरे आणि शिंदे निवडणूक आयोगाच्या कोर्टात समोरासमोर आलेत. आयोगासमोर शिंदे-ठाकरेंनी आयोगासमोर पुरावेही सादर केलेत. आता 12 डिसेंबर रोजी सुनावणी होणार असून, आयोगाने शिंदे-ठाकरेंना आपापला दावा मजबुत करण्यासाठी शेवटची संधी दिलीये.

एकनाथ शिंदेंनी 40 आमदार आणि 12 आमदारांच्या पाठिंब्यावर थेट शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत बदल केले आणि तसं पत्र केंद्रीय आयोगाला दिलं. त्यानंतर शिंदे गट हाच खरी शिवसेना असल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी निवडणूक आयोगाकडे केला. याविरोधात ठाकरे गटाने आयोगाला पत्र दिलं. मात्र, अंधेरीच्या पोटनिवडणुकीमुळे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं.

धनुष्यबाण चिन्ह गोठवताना न्यायालयाने ठाकरे गट (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिंदे गट (बाळासाहेबांची शिवसेना) यांना पक्ष आणि विधिमंडळातील समर्थासंदर्भातील पुरावे सादर करण्यास सांगितले होते. केंद्रीय निवडणूक आयोगाने 23 नोव्हेंबरपर्यंत शिवसेनेवरील दाव्यासंदर्भातील कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. त्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटाने आपापल्या समर्थकांची लाखो शपथपत्रे आयोगासमोर सादर केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

खरी शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? केंद्रीय निवडणूक आयोग कसं ठरवणार?

दावा मजबूत करण्यासाठी शिंदे-ठाकरेंना अखेरची संधी

शिंदे गट आणि ठाकरे गटाला 23 नोव्हेंबरपर्यंत सर्व कागदपत्रे सादर करण्यास सांगितलं होतं. आता निवडणूक आयोगाने शिवसेना कुणाची? हा प्रश्न निकाली काढण्यासाठी सुनावणीची तारीख निश्चित केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर 12 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने ठाकरे आणि शिंदे गटाला काही कागदपत्रे सादर करायची असल्यास 9 डिसेंबरपर्यंत सादर करावेत, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे शिंदे आणि ठाकरेंना शिवसेनेवरील दावा पक्का करण्यासाठी आणखी पुरावे सादर करण्यासाठी आणखी एक आणि अखेरची संधी मिळाली आहे.

ADVERTISEMENT

शिवसेना, धनुष्यबाण कुणाचा? निवडणूक आयोग कसं ठरवणार?

शिवसेनेवर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी दावा केलाय. त्यामुळे निवडणूक आयोग कोणत्या निकषांवर निर्णय घेणार? याची उत्सुकता सगळ्यांना लागलीये. याच मुद्द्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी यापूर्वीच आयोगाची भूमिका स्पष्ट केलेली आहे.

ADVERTISEMENT

S Y Quraishi : ‘दोन गोष्टींवरून निवडणूक आयोग ठरवणार शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची?’

काही दिवसांपूर्वी राजीव कुमार यांना याबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावर ते म्हणाले होते की, ‘यासाठी प्रक्रिया निश्चित केलेली आहे. ही प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शक असून, जेव्हा केव्हा आम्ही याचा याची आढावा घेऊ, तो बहुमताच्या नियम लागू केला जाईल. यात महत्त्वाचं तत्व एकच असेल, ते म्हणजे बहुमताचा नियम’, असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं होतं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT