Nagpur MLC : एक फोन अन् गंगाधर नाकाडे सिग्नल तोडून पोहचले… काय घडलं?
Nagpur MLC Election 2023 Update : नागपूर : विधान परिषद निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी नागपूर शिक्षक मतदारसंघातून पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यात नीलकंठ उईके, अतुल रुईकर, मुकेश पुडके, गंगाधर नाकाडे आणि मृत्युंजय सिंग यांनी त्यांचे अर्ज मागे घेतले. तर शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे आणि सतीश इटकेलवार यांनी त्यांचे अर्ज कायम ठेवले. (Shiv […]
ADVERTISEMENT

Nagpur MLC Election 2023 Update :
नागपूर : विधान परिषद निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी नागपूर शिक्षक मतदारसंघातून पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यात नीलकंठ उईके, अतुल रुईकर, मुकेश पुडके, गंगाधर नाकाडे आणि मृत्युंजय सिंग यांनी त्यांचे अर्ज मागे घेतले. तर शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे आणि सतीश इटकेलवार यांनी त्यांचे अर्ज कायम ठेवले. (Shiv Sena (UBT) candidate Gangadhar Nakade withdrew his nomination)
नागपूरमध्ये पंचरंगी लढत पाहायला मिळणार आहे. यात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आणि भाजप पुरस्कृत उमेदवार नागो गाणार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघटना आणि महाविकास आघाडी समर्थित सुधाकर अडबाले, शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे, राष्ट्रवादीतून निलंबित झालेले सतीश इटकेलवार आणि आम आदमी पक्षाचे डॉ. देवेंद्र वानखेडे हे प्रमुख उमदेवार रिंगणात आहेत.
Nagpur MLC Election 2023 : निष्ठावंत नेत्यानं सोडली उद्धव ठाकरेंची साथ