BJP MPs : केंद्रीय मंत्र्यांसह भाजपच्या 10 खासदारांचे राजीनामे, पहा यादी

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

bjp 12 leader resigned as member of parliament.
bjp 12 leader resigned as member of parliament.
social share
google news

BJP MPs Resigns : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपने केंद्रीय मंत्री आणि काही खासदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. यातील काही खासदारांना पराभवाला सामोरे जावे लागले. दुसरीकडे जे खासदार आणि केंद्रीय मंत्री निवडून आले आहे, त्यांनी खासदारकीचे राजीनामे दिले आहेत. भाजपने बुधवारी एका बैठकीत हा निर्णय घेतला. (12 MPs of BJP who won assembly elections will leave membership of Parliament From Rajasthan, Madhya pradesh)

भाजपने पाचपैकी तीन राज्यात प्रचंड बहुमत मिळवलं आहे. तर तेलंगणात आठ जागा जिंकल्या आहेत. चार राज्यात भाजपने २१ खासदारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं होतं. राजस्थान आणि प्रध्य प्रदेशातून प्रत्येकी सात खासदार विधानसभा निवडणुकीच्या मैदानात होते. छत्तीसगडमध्ये चार, तर तेलंगणामध्ये तीन खासदारांना विधानसभेचे तिकीट दिले गेले होते.

खासदारकीचे राजीनामे घेण्याचा भाजपचा निर्णय

विधानसभा निवडणुकीत विजय झालेल्या केंद्रीय मंत्र्यांसह खासदारांचे राजीनामे घेण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत सर्व खासदारांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मोदींच्या मंत्रिमंडळातून तीन मंत्री होणार कमी

खासदारकीचा राजीनामा देणाऱ्यांमध्ये प्रल्हाद सिंह पटेल आणि नरेंद्र सिंह तोमर यांचा समावेश आहे. हे दोघेही केंद्रीय मंत्री आहेत. तर छत्तीसगडमधील लोकसभा सदस्य आणि केंद्रीय मंत्री रेणुका सिंह सुद्धा राजीनामा देणार आहेत. त्यामुळे मोदींच्या मंत्रिमंडळातून तीन मंत्री कमी होणार आहेत. त्याचबरोबर राजस्थानातील भाजपचे खासदार बाबा बालकनाथही लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहेत.

राजस्थान…

राज्यवर्धन राठोड
दिया कुमारी
किरोडी लाल मीना (राज्यसभा खासदार)

ADVERTISEMENT

मध्य प्रदेश

नरेंद्र सिंह तोमर
प्रल्हाद पटेल
राकेश सिंह
रीति पाठक
उदय प्रताप सिंह

ADVERTISEMENT

छत्तीसगड

गोमती साईं
अरुण साव

भाजपने कुणाला दिली होती विधानसभेची उमेदवारी

मध्य प्रदेशातून नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद सिंह पटेल, फग्गन सिंह कुलस्ते, राकेश सिंह, राव उदय प्रताप, रीति पाठक, गणेश सिंह यांना तिकीट दिले होते.

राजस्थानातून बाबा बालकनाथ, भागीरथ चौधरी, किरोडी लाल मीणा, दिया कुमारी, नरेंद्र खिचड, राज्यवर्धन राठोड, देवजी पटेल यांना उमेदवारी दिली होती.

छत्तीसगडमधून विजय बघेल, गोमती साय, रेणुका सिंह, अरुण साव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले होते.

तेलंगणामधून बंदी संजय कुमार, धर्मपुरी अरविंद आणि सोयम बाबू या खासदारांना भाजपने तिकीट दिले होते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT