अजित पवार गटातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर, 137 जणांचा राजीनामा! असं घडलं तरी काय?
लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. या बातमीनंतर आता अजित पवार गटाचं टेन्शन वाढणार आहे.
ADVERTISEMENT
NCP Ajit Pawar : लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. या बातमीनंतर आता अजित पवार गटाचं टेन्शन वाढणार आहे. लोणावळ्यात त्यांच्या गटातील महत्त्वाच्या नेत्यांसह जवळपास 137 जणांनी राजीनामा दिला आहे. (137 people from NCP Ajit Pawar group resigned from party in lonavala What happened)
ADVERTISEMENT
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आता कधीही लोकसभा निवडणूक जाहीर होऊ शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, यामुळेच राष्ट्रवादी काँग्रसच्या अजित पवार गटाची जागावाटपावर 5 आणि 6 तारखेला मॅरेथॉन बैठक पार पडणार आहे. यावेळी अजित पवार गटाकडू लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू असताना त्यांच्या गटात अशाप्रकारची घटना घडल्याने हा मोठा धक्का मानला जात आहे.
137 जणांनी राजीनामा देण्यामागील कारण काय?
माहितीनुसार, मावळचे आमदार सुनील शेळके यांनी हस्तक्षेप केल्याने नाराजी व्यक्त करत सर्वांनी राजीनामा दिला आहे. विनोद होगले हे लोणावळा युवक शहराध्यक्ष म्हणून होते. मात्र आमदार शेळके यांनी परस्पर निर्णय घेत लोणावळा युवक शहराध्यक्ष पदी मंगेश मावकर यांना संधी दिली. यामुळेच पक्ष संघटनेत डावलत असल्याचा आरोप करत महिला, युवती, तरुणांनी राजीनामा दिला आहे.
हे वाचलं का?
'आम्ही आमच्या निर्णयावर...' राजीनामा देणाऱ्यांचे ठाम मत!
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या मावळमधील आणि पुणे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. वरिष्ठ नेत्यांकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र ते राजीनामा देणारे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. “आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत, आम्ही राजीनामा दिला आहे. 20 ते 25 वर्ष झालं पक्षाच काम केलं, आम्हाला डावलून इतरांना संधी का?”, असा स्पष्टच सवाल त्यांनी पक्षाला विचारला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT