राहुल गांधी फिरोज खानची पिलावळ, शरद पोक्षेंनी तोडले अकलेचे तारे

मुंबई तक

ADVERTISEMENT

actor sharad ponkshe criticize rahul gandhi surname malegaun congress ncp reply
actor sharad ponkshe criticize rahul gandhi surname malegaun congress ncp reply
social share
google news

शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji bhide) यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल गरळ ओकल्याची घटना ताजी असतानाच आता अभिनेते शरद पोक्षे (Sharad Ponkshe)  यांनी गांधींवरून विधान करून अकलेचे तारे तोडले आहेत. हे काही ओरिजनल गांधी नसून खान आहेत, फिरोज खान यांची पुढची ही पिलावळ असल्याची टीका शरद पोंक्षे यांनी केली आहे. हे काही महात्मा गांधीचे वंशज नाही तर त्यांच्या आडनावाचा फायदा यांनी घेतल्याचा आरोप शरद पोंक्षे यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर केला आहे. शरद पोंक्षे यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळ चांगलेच तापले आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या प्रकरणावरून आता शरद पोंक्षे यांना प्रत्युत्तर दिले आहे. (actor sharad ponkshe criticize rahul gandhi surname malegaun congress ncp reply)

ADVERTISEMENT

काय म्हणाले शरद पोंक्षे?

स्वातंत्र्यदिनी मालेगावात विचार मंचतर्फे प्रबोधन आणि जनजागृतीसाठी वीर सावरकरांवरील जीवनावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला शरद पोंक्षे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या वाख्यानाला संबोधित करताना शरद पोंक्षे यांनी राहुल गांधीवर सडकून टीका केली होती.

हे ही वाचा : Ajit Pawar:मोदींकडून मोठी ऑफर?, Sharad Pawar यांनी अजितदादांना दाखवली जागा!

एक तर तू गांधी नाहीस आणि सावरकरही नाहीस, हे काही ओरिजनल गांधी नसून खान आहेत. फिरोज खान यांची पुढची ही पिलावळ असल्याचा इतिहास आहे, अशी टीका शरद पोंक्षे यांनी केली होताी. तसेच हे काही महात्मा गांधीचे वंशज नाही तर त्यांच्या आडनावाचा फायदा यांनी घेतला. या मुर्खांना यांच्या आजीचा इतिहास माहित नाही, तर यांना
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कसा माहित असणार? अशी टीका शरद पोक्षे यांनी केली. राफेल प्रकरणात सुद्धा त्यांनी सुप्रीम कोर्टात माफी मागितली. जोपर्यंत अपिल करण्याची संधी आहे, तोपर्यंत हे कोर्टात माफी मागत असतात. सावरकर प्रकरणात हेच झाले,असेही पोंक्षे यांनी यावेळी व्यासपिठावरून सांगितले.

हे वाचलं का?

काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांची टीका

शरद पोंक्षे यांनी केलेल्या या विधानावर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आक्षेप घेत टीका केली आहे. शरद पोंक्षे हा अभिनेता म्हणून टुकार तर आहेच, पण माणूस म्हणून ही नीच आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. अतुल लोंढेसह आता जितेंद्र आव्हाड यांनी देखील टीका केली आहे.हा विकृत पोंक्षे अजुन काय बोलू शकतो, नथुरामचा अवलाद अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शरद पोंक्षेंवर टीका केली. या घटनेमुळे आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

हे ही वाचा : NCP चा नेमका अध्यक्ष कोण? शरद पवारांकडे मागितले ‘पुरावे’, फक्त ‘एवढीच’ मुदत

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT