मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा मोर्चा, आदित्य ठाकरे काय बोलणार?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला आहे. मेट्रो सिनेमा ते महापालिका गेट न. 1 पर्यंत हा मोर्चा काढला गेला.
ADVERTISEMENT
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढण्यात आला आहे. मेट्रो सिनेमा ते महापालिका गेट न. 1 पर्यंत हा मोर्चा काढला गेला. मुंबईकरांच्या पैशांच्या उधळपट्टीचा जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील विविध भागातून शिवसेनेच पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. या मोर्चानंतर आदित्य ठाकरे शिवसेनेला संबोधित करत आहेत. (aditya thackerays long march on mumbai municipal corporation account of the extravagance of mumbaikars’ money)
ADVERTISEMENT
भाषणातील महत्वाचे मुद्दे
- 600 कोटी कॉन्ट्रक्टरच्या खिशात जाणार होते, हे आपण वाचवले.
- जून पर्यंत 50 रस्ते बनवू, पण 50 शिवाय यांना काही दिसत नाही.
- तुम्हाला पप्पू चॅलेंज देतो, या अंगावर एकटे या किंवा पुर्ण फौजेला घेऊन या.आहे माझी तयारी माझ्या छातीवर वार करायला या
- 50 रस्तेही तुम्ही पुर्ण करू शकत नाही.
- एक सुद्धा रस्ता पुर्ण करू शकले नाही आहेत.
- मुंबईसाठी काम करत आहात की खोके सरकारच्या दलालांसाठी काम करत आहात.
- मुंबईचा प्रवास, प्रगती रोखायची..
- तिसरा घोटाळा स्ट्रीट फर्निचर घोटाळा
- खोके सरकार 100 टक्के भ्रष्ट आहे.आतून बाहेरून भ्रष्ट आहे
- मला माहितीय यांच्या सभेला गर्दी होत नाही, मग खुर्च्या हा बेंचेस कशाला घेताय 40 हजार बेंचेस लावणार कुठे
- 10 हजार कुंड्या घेतायत या कुंड्यात काय लावणार हेच माहित नाही.
- हे सर्व वर्षभऱापासून होत आहे.
- स्वत:च्या घोटाळ्याबाबत स्वत:च उत्तर देत आहेत.
- महापालिकेत जे चाललंय ते योग्य नाही आहे.
- मुंबईच्या ठेवी 600 कोटी होत्या त्या 92 हजार कोटी पर्यंत नेल्या.
- यांना दिल्लीसमोर कटोरा घेऊन उभे राहायचे आहे.
- शाखा पडली याचे दु:ख नाही, कोणाच्या फोटोवर चालवला होता?
- ज्या दिवशी आपले सरकार येईल त्यावेळी यांच्यावर बुलडोझर चालवल्याशिवाय राहणार नाही
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT