Lok Sabha election 2024 : शरद पवारांनी मोदींची पुतीन यांच्याशी का केली तुलना?
Sharad Pawar Narendra Modi : पंतप्रधान मोदी यांनी रामटेक येथील सभेत बोलताना विरोधकांना एकही जागा जिंकून देऊ नका, असे आवाहन केले होते. त्यावरून शरद पवारांनी मोदींवर टीकास्त्र डागले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्लादिमीर पुतीनसोबत तुलना

शरद पवार यांची मोदींवर टीका

रामटेक येथील सभेत केलेल्या विधानावरून साधला निशाणा
Sharad Pawar On PM Modi : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मोठं विधान केले. पवारांनी मोदींची तुलना रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी केली. पुतीन आणि मोदी यांच्यात काही फरक राहिलेला नाही, असं पवार का म्हणाले तेच जाणून घ्या. (Sharad Pawar Says PM Narendra Modi is Similar to vladimir putin)
शरद पवार हे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भेटीसाठी अकलूज येथे आले होते. शिवरत्न या बंगल्यावर सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार यांच्यासह काही प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर पवारांची पत्रकार परिषद झाली.
याच पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका विधानावर बोट ठेवत शरद पवार यांनी ते पुतीन यांच्यासारखेच बनले असल्याचे विधान केले.
'चारशे पार'च्या घोषणेवर पवारांचं उपरोधिक उत्तर
भाजप चारशे पार म्हणत आहे, त्यात कितपत तथ्य आहे? या प्रश्नाला पवारांनी सुरुवातीला उपरोधिक उत्तर दिले. ते म्हणाले की, "नाही. थोडी चूक आहेत त्यात. कारण ५४३ जागा त्यामुळे त्यांनी तिथपर्यंतचा आकडा सांगणं योग्य राहील."